Gautami Patil: छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक हातात घेताना गौतमीने केलं असं काही...VIDEO तुफान व्हायरल

Last Updated:

Gautami Patil: सबसे कातिल गौतमी पाटीलला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. कारण ती सतत प्रकाश झोतात आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असते. आपल्या सौदर्याने आणि डान्सने तिने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

गौतमी पाटील
गौतमी पाटील
मुंबई : सबसे कातिल गौतमी पाटीलला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. कारण ती सतत प्रकाश झोतात आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असते. आपल्या सौदर्याने आणि डान्सने तिने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. गौतमीने नुकतीच पुण्यात हजेरी लावली होती. मात्र यावेळी तिच्या डान्स शोसाठी नाही तर पुस्तक महोत्सवासाठी. या कार्यक्रमातील गौतमीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय ज्याने सर्वांची मने जिंकली.
काल 21 डिसेंबर रोजी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी अनेक कलाकारांना आमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये गौतमीला खास आमंत्रण मिळालं आणि तिनं हजेरी लावली.
advertisement
गौतमी पाटीलचा VIDEO
पुणे पुस्तक महोत्सवात हजेरी लावलेल्या गौतमीला लेखक नितीन थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची कादंबरी दिली. पुस्तक घेताना गौतमीने जे केलं त्याने लोकांची मने जिंकली. गौतमीची ही कृती पाहून लोक तिचं कौतुक करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची कादंबरी घेताना गौतमीने पायातील चप्पल काढली. तिची ही कृती पाहून लोक तिचं कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरत आहे आणि लोकांची मने जिंकत आहे.
advertisement
advertisement
दरम्यान, पुणे पुस्तक महोत्सवात बोलताना गौतमी म्हणाली, “मला इतर ठिकाणी नाचायला बोलवतात पण इकडे पुस्तक वाचायला बोलावलं. पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरला आहे मला यापुढे मोकळा वेळ मिळाला तर मी पुस्तक वाचणार आहे.” गौतमी पुढे म्हणाली, “पुस्तक महोत्सवाला आल्यामुळे मला चालना मिळेल वळण मिळेल. मला लहानपणापासून डान्स करत होते पण आता नक्की पुस्तक वाचेन. सर्वांनी पुस्तक वाचा. मला पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नाही पण इथून पुढे नक्की पुस्तक वाचणार आहे.”
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil: छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक हातात घेताना गौतमीने केलं असं काही...VIDEO तुफान व्हायरल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement