अमृता-सैफचा लाडका लेक या अभिनेत्रीच्या लेकीला करतोय डेट? पापाराझींनी पकडताच लपवला चेहरा, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीबरोबर 31डिसेंबरच्या रात्री एका गाडीत दिसला. त्याच्याबरोबर असलेल्या अभिनेत्रीबरोबरचा त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
मुंबई : संपूर्ण बॉलिवूड सरत्या वर्षाला गुडबाय करण्यासाठी सज्ज झालं होतं. सरत्या वर्षाला निरोप नव्या वर्षाचं सगळ्यांनी अगदी आनंदानं स्वागत केलं. बॉलिवूड कलाकारांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. मोठ-मोठ्या पार्ट्या देखील झाल्या. दरम्यान या पार्टीतून बॉलिवूडमधील आणखी एक सेलेब्स किड्सची जोडी रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा लाडका लेक इब्राहिम अली खान बॉलिवूडमधीलच एक अभिनेत्रीच्या मुलीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही पण दोघांना 31 डिसेंबरच्या रात्री एका गाडीत स्पॉट करण्यात आलं.
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीबरोबर 31डिसेंबरच्या रात्री एका गाडीत दिसला. ती स्टार किड इब्राहिमची मैत्रिण आहे की आणखी कोणी हे समजलं नसलं तरी दोघांनी पापाराझींना पाहून मात्र तोंड लपवली. त्यांची ही रिअँक्शन पापाराझींनी त्यांच्या कार्यक्रमात अचूक हेरली.
advertisement
अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी इब्राहिम अली खानला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. पलक 2023मध्ये आलेल्या सलमान खानच्या किसीका भाई किसीकी जान या सिनेमात दिसली होती. श्वेता तिवारीच्या लेकीच्या डेब्यू फिल्मला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मात्र पलक फारशी चर्चेत आली नाही. मात्र 2023च्या शेवटच्या दिवशी ती इब्राहिम अली खानबरोबर स्पॉट झाली.
advertisement
बॉलिवूडकरांच्या 31डिसेंबरच्या पार्ट्या दणक्यात साजऱ्या झाल्या. सेलेब्सनी पापाराझींना पोझेस देत फोटोशूट देखील केलं. दरम्यान इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकत्र एका गाडीतून पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. समोर पापाराझींना पाहाताच दोघांनी आपली तोंड लपवली. दोघे एकमेकांचे फक्त चांगले मित्र असते तर तोंड लपवायची काय गरज होती? असं म्हणत नेटकऱ्यांनी दोघांनी हेरलं आहे. दोघांमध्ये नक्कीच काय तरी असून दोघेही रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
advertisement
इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पलकला 'पतौडी कुटुंबाची नवीन सून' असं म्हटलं आहे. तर काहींनी थेट श्वेता तिवारीवर निशाणा साधत 'बघ तुझी मुलगी काय करत आहे,' असं म्हटलंय. तर अनेकांनी दोघांच्या नात्यावर शिक्का मोर्तब देखील करून टाकला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2024 12:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अमृता-सैफचा लाडका लेक या अभिनेत्रीच्या लेकीला करतोय डेट? पापाराझींनी पकडताच लपवला चेहरा, VIDEO