आधी दहशतवाद्यांनी किडनॅप केलं, मग हाल हाल करुन मारलं, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांसोबत थरकाप उडवणारा प्रसंग
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actress Father Killed By Terrorists:भारत-पाकिस्तान तणावामुळे जगभरात सध्या भीतीचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील सुरु असलेल्या हल्ल्यामुळे लोकही घाबरले आहेत.
मुंबई : भारत-पाकिस्तान तणावामुळे जगभरात सध्या भीतीचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील सुरु असलेल्या हल्ल्यामुळे लोकही घाबरले आहेत. पाकिस्तान टेररिस्टला धडा शिकवण्यासाठी भारतीय सेना सीमेवर लढा देत आहेत. अशा परिस्थितीत अनेक जवान शहीद होतात. एका अभिनेत्रीचे वडीलही असेच देशासाठी शहीद झाले होते. त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग आठवला तरी थरकाप उडतो, अंगावर काटा येतो. ही अभिनेत्री कोण आहे? आणि तिच्या वडिलांसोबत काय झालं होतं याविषयी जाणून घेऊया.
आर्मी कुटुंबातून येणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून निम्रत कौर आहे. ग्लॅमर जगतात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री लष्करी पार्श्वभूमीतून आली आहे. तिचे वडील, मेजर भूपेंद्र सिंग, हे भारतीय सैन्यात इंजिनिअर अधिकारी होते. मात्र देशसेवेच्या मार्गावर त्यांनी आपल्या प्राणांचीही आहुती दिली.
advertisement
1994 सालची गोष्ट. निम्रत फक्त 12 वर्षांची होती. तिचे वडील काश्मीरमधील वेरीनाग येथे पोस्टेड होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. सात दिवस त्यांनी त्यांना बंदिवान बनवले होते. दहशतवाद्यांनी सरकारकडे काही मागण्या ठेवल्या होत्या. त्या मान्य न झाल्याने त्यांनी मेजर भूपेंद्र सिंग यांची निर्घृण हत्या केली. देशासाठी जीव गमावणाऱ्या त्या शूर अधिकाऱ्याचे वय फक्त 44 वर्षे होते.
advertisement
या धक्क्याचा निम्रतच्या बालपणावर खोल परिणाम झाला. पण या कठीण प्रसंगाने तिला अधिक मजबूत बनवलं. अनेक वर्षांनी दिलेल्या एका मुलाखतीत निम्रतने सांगितलं की, तिने पहिल्यांदा वडिलांचा मृतदेह दिल्लीमध्ये पाहिला, आणि ते क्षण आयुष्यभर विसरणं शक्य नाही.
दरम्यान, आज निम्रत कौर बॉलिवूडमधील एक चर्चेतील नाव आहे. तिने 'एअरलिफ्ट', 'दसवी', 'द लंचबॉक्स', 'द टेस्ट केस' आणि अलीकडील 'कुल' या वेबसीरिजमध्ये दमदार भूमिका साकारल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 11, 2025 8:37 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी दहशतवाद्यांनी किडनॅप केलं, मग हाल हाल करुन मारलं, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांसोबत थरकाप उडवणारा प्रसंग