Kantara Chapter 1 च्या OTT रिलीजबाबत मोठी अपडेट! कधी आणि कुठे पाहता येणार?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Kantara Chapter 1 OTT Release : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून लवकरच हा ओटीटीवर येणार आहे.
Kantara Chapter 1 OTT Release : ऋषभ शेट्टीचा बहुचर्चित 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये आलेल्या 'कांतारा'चा हा प्रीक्वल आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. फक्त साऊथ नव्हे तर संपूर्ण देशभरात सध्या 'कांतारा'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. अॅडवान्स बुकिंगवरुनच हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार असं म्हटलं जात होतं. अखेर रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड केले आहेत. त्यामुळे आता हा 'कांतारा चॅप्टर 1' कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
ऋषभ शेट्टीने नॉर्थमधील लोकांना आपल्या चित्रपटाकडे वळवण्यासाठी दिलजीत दोसांझचं एक खास गाणं ठेवलं आहे. त्यामुळे सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक होत आहे. रिपोर्ट्सनुसार, कोटींमध्ये या चित्रपटाचे ओटीटी राईट्स विकले गेले आहेत.
'कांतारा चॅप्टर 1' ओटीटीवर कधी रिलीज होणार?
ओटीटी प्लेच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. येत्या 30 ऑक्टोबरपासून हा चित्रपट प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात. चित्रपटगृहातील रिलीजच्या चार आठवड्यांनी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत 30 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तर हिंदींत आठ आठवड्यांनी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
advertisement
बॉक्सऑफिस 'कांतारा'मय
'कांतारा चॅप्टर 1'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटी रुपयांची कमाई केल्याचंही म्हटलं जात आहे. 'कांतारा चॅप्टर 1' हा या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. ओपनिंग डेलाच या चित्रपटाने 'छावा' आणि 'सैयारा' या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 5:31 PM IST