Kantara : 'कांतारा'चा थरार कायम, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढील चित्रपटाचं नाव?

Last Updated:

Rishab Shetty Kantara Chapter 1 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची कथा अजून संपलेली नाही. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भागही येणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

News18
News18
Rishab Shetty Kantara : दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा 'कांतारा:चॅप्टर 1' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की, 'कांतारा'ची कथा अजून संपलेली नाही. लवकरच या बहुचर्चित चित्रपटाचा तिसरा भागही येणार आहे. 'कांतारा'चा पहिला भाग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. आता दुसरा भागही सिनेप्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला पाहायला मिळत आहे. अशातच या बहुचर्चित चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्याने यात काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'कांतारा'च्या तिसऱ्या भागाचं नाव 'चॅप्टर 1'च्या शेवटी जाहीर करण्यात आलं आहे. 'कांतारा:अ लीजेंड-चॅप्टर 2' असं या तिसऱ्या भागाचं नाव असणार आहे. 'कांतारा' हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1990 च्या दशकावर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. 'कांतारा: चॅप्टर 1’ची कथा पहिल्या भागातील घटनांपासून हजार वर्षांपूर्वीच्या काळात घडते. त्यामुळे हा चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल आहे. 2023 मध्ये ऋषभ शेट्टीने जाहीर केले होते की, प्रेक्षकांनी जो चित्रपट पाहिला तो प्रत्यक्षात भाग 2 होता आणि पुढील चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वेल असेल. ऋषभ शेट्टी म्हणाला होता,"आम्हाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या अपार प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप आभार आणि या प्रवासाला पुढे नेत देवाच्या आशीर्वादाने चित्रपटाने यशस्वीरित्या 100 दिवस पूर्ण केले आहेत. या खास प्रसंगी मी ‘कांतारा’च्या प्रीक्वेलची घोषणा करू इच्छितो. जो चित्रपट तुम्ही पाहिला तो भाग 2 होता आणि आता भाग 1 पुढील वर्षी येणार आहे.
advertisement
कदंब कालावर आधारित कथानक
‘कांतारा: चॅप्टर 1’ची कथा कर्नाटकातील कदंब कालावर आधारित आहे. कदंब वंश हे कर्नाटकातील काही भागांतील प्रमुख शासक होते आणि त्यांनी तेथील स्थापत्यकला व संस्कृती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा काळ भारतीय इतिहासातील एक सुवर्णयुग मानला जातो. ऋषभ शेट्टीनेच या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनची धुरा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेतही आहे.
advertisement
'सैयारा' अन् 'छावा'ला टाकलंय मागे
‘कांतारा: चॅप्टर 1’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अद्याप कमाईचे अधिकृत आकडे समोर आलेले नाहीत. त्यामुळे 'कांतारा:चॅप्टर 1'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर सैयारा (22 कोटी), सिकंदर (26 कोटी) आणि छावा (31 कोटी) रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kantara : 'कांतारा'चा थरार कायम, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढील चित्रपटाचं नाव?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement