Mahesh Kothare : बाप्पांचा आशिर्वाद...महेश कोठारे ठरले नशीबवान! मोदकातून निघाली खास गोष्ट; VIDEO व्हायरल
Last Updated:
Mahesh Kothare : स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या 'नशीबवान' आणि 'लपंडाव' मालिकेच्या लाँचदरम्यान महेश कोठारे नशीबवान ठरले आहेत.
Mahesh Kothare : स्टार प्रवाहवर 'नशीबवान' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेत नशीबाचा मोदक कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर डॅम इट महेश कोठारे यांना हे चांदीचं नाणं मिळालं आहे. कृष्ण धवल ते रंगीत चित्रपटांच्या प्रवासाचे जे साक्षीदार आहेत अशा महेश कोठारे यांना हे चांदीचं नाणं मिळाल्याने उपस्थित असलेल्या सर्वांना प्रचंड आनंद झाला. विशेष म्हणजे महेश कोठारे या मालिकेचे निर्मातेदेखील आहेत.
चांदीचं नाणं मिळाल्यानंतर न्यूज 18 मराठीसोबत बोलताना महेश कोठारे म्हणाले,"नशीबवान' मालिकेच्या पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित सर्व मंडळींना उकडीचे मोदक वाटले. यातील एका मोदकात फक्त चांदीचं नाणं होतं. हे चांदीचं नाणं ज्याला मिळेल तो 'नशीबवान' असा हा पब्लिसिटीचा प्रकार होता. सर्वांप्रमाणे मीदेखील एक मोदक उचलला आणि नेमकं माझ्याच मोदकात चांदीचं नाणं मिळालं. हा खरेतर योगायोग ठरला. हे चांदीचं नाणं माझ्यासाठी फक्त सिन्बॉल आहे. 'नशीबवान' हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे हे चांदीचं नाणं हे माझ्यासाठी या मालिकेचं प्रतिक ठरलं आहे".
advertisement
advertisement
'नशीबवान' या मालिकेच्या माध्यामातून अभिनेता आदिनाथ कोठारे अनेक दिवसांनी छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या मालिकेची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. यासंदर्भात बोलताना महेश कोठारे म्हणाले,"नशिबवान'मधील भूमिका आदिनाथला खूप आवडल्याने त्याने ही मालिका करण्याचा निर्णय घेतला. हा आमच्यासाठी खरंच एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे".
advertisement
'नशीबवान' ही मालिका येत्या 15 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर ही मालिका पाहता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mahesh Kothare : बाप्पांचा आशिर्वाद...महेश कोठारे ठरले नशीबवान! मोदकातून निघाली खास गोष्ट; VIDEO व्हायरल