राजीव गांधींचा फेव्हरेट पोलिस, लता मंगेशकरांनी घरी बोलवलं; Netflixवर दिसणार का ‘इन्स्पेक्टर झेंडे’ची खरी स्टोरी?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Inspector Zende Netflix: चार्ल्स शोभराजला दोनदा पकडणारे मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘इन्स्पेक्टर झेंडे’ लवकरच नेटफ्लिक्सवर येतोय. पण त्यांच्या खरी कहाणीमध्ये लता मंगेशकर, दिलीपकुमार आणि राजीव गांधींसारख्या दिग्गजांचीही खास नाती दडली आहेत.
नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिका साकारणार असून तो खऱ्या आयुष्यातील एका शूर पोलिस अधिकाऱ्याच्या प्रेरणेतून साकारला आहे. माजी मुंबई पोलिस अधिकारी माधुकर बापूराव झेंडे यांनी कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला एकदा नाही तर दोनदा पकडलं होतं. हाच किस्सा पडद्यावर मांडला जाणार आहे. लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित हा चित्रपट उद्या म्हणजेच 5 सप्टेंबर 2025 शुक्रवार रोजी रिलीझ होणार आहे.
advertisement
चार्ल्स शोभराजची पहिली भेट
‘आवारा मुसाफिर’ या मुलाखतीत झेंडे यांनी 1971 मधील त्यांचा पहिला अनुभव सांगितला. चार्ल्स शोभराज ताज हॉटेलमध्ये राहत होता, तर त्याचे साथीदार मुंबईतील इतर हॉटेलमध्ये थांबले होते. झेंडे आणि त्यांच्या टीमने अनेक दिवस हॉटेलबाहेर पहारा दिला. अखेर एके दिवशी शोभराज सूट-बूट परिधान करून बाहेर पडताना दिसला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे शस्त्रसुद्धा आढळले तसेच काही हॉटेलच्या पावत्याही मिळाल्या, ज्यातून त्याच्या साथीदारांचा पत्ता लागला. झेंडे यांच्या म्हणण्यानुसार, तो काहीतरी मोठं प्लॅन करत होता.
advertisement
तुरुंगातून पळाल्यानंतर
ताज हॉटेलमधील पहिल्या अटकेनंतरही शोभराज नंतर दिल्लीच्या तिहार जेलमधून पळून गेला. त्याने आपल्या वाढदिवशी अधिकाऱ्यांना मिठाईत औषधं देऊन बेशुद्ध केले आणि फरार झाला. काही काळाने पुन्हा भारतात परतल्याची बातमी आली. प्रकरणाची जबाबदारी पुन्हा झेंडे यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांना थोड्या लोकांसह आणि अत्यल्प खर्चात गोव्यात पाठवण्यात आलं. तिथे त्यांनी आपल्या शोधमोहीमेकरिता एक वेगळा प्लॅन आखला – ते हरवलेल्या भावाचा शोध घेत असल्याचं भासवत फिरू लागले. ज्याच्याकडे शोभराजसारखीच मोटरसायकल असल्याचा बहाणा त्यांनी केला.
advertisement
दोऱ्यांनी बांधलं
शेवटी झेंडे आणि त्यांच्या टीमने शोभराजला एका कॅफेमध्ये शोधून काढलं. तो कॅप घालून वेषांतर केलेला होता आणि त्याच्याकडे एक डफेल बॅग होती. झेंडे यांनी प्रसंगावधान राखून लगेचच कारवाई केली. “मी त्याला पकडून मोठ्याने ‘चार्ल्स!’ असं ओरडलो. माझ्या सहकाऱ्याने त्याची बॅग हिसकावून घेतली आणि त्यातून रिव्हॉल्वर बाहेर काढला. पण आमच्याकडे हातकड्या नव्हत्या. मग आम्ही कॅफेतील कर्मचाऱ्यांकडून दोऱ्या मागवल्या आणि त्याला बांधून टाकलं, असं झेंडे यांनी सांगितलं.
advertisement
पोलिस अधिकाऱ्यापासून ‘सेलिब्रिटी’पर्यंत
या धाडसी कारवाईनंतर झेंडे यांना राष्ट्रीय स्तरावर प्रचंड ओळख मिळाली. त्यांची भेट राजीव गांधी आणि अभिनेता दिलीपकुमार यांच्यासारख्या व्यक्तींशी झाली. ते अमूलच्या जाहिरातीतही झळकले. गायिका लता मंगेशकर यांनी त्यांना खास घरी बोलावून अभिनंदन केले. ते सलग दोन वर्षे प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पहिले अधिकारी ठरले – Police Medal for Meritorious Service आणि President’s Medal for Distinguished Service. 1959 ते 1996 या काळात त्यांनी मुंबई पोलिस दलात सेवा बजावली.
advertisement
मनोज वाजपेयीचा अनुभव
इन्स्पेक्टर झेंडे यांची गोष्ट मला भावली कारण ते प्रसिद्धीच्या मागे नव्हते, ते फक्त आपलं काम करत होते. त्यांनी दोनदा देशातील सर्वात कुख्यात गुन्हेगाराला पकडलं. त्यांचा धाडस, विनोदबुद्धी आणि मुंबईचं ते खास रंग त्यांना प्रेरणादायी बनवतात. त्यांना भेटणं म्हणजे जणू गोष्टींच्या खजिन्यात प्रवेश करणं होतं, असे मनोज वाजपेयीने सांगितले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 6:31 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
राजीव गांधींचा फेव्हरेट पोलिस, लता मंगेशकरांनी घरी बोलवलं; Netflixवर दिसणार का ‘इन्स्पेक्टर झेंडे’ची खरी स्टोरी?