OTT Weekend Watch: वीकेंडला ओटीटीवर भन्नाट मेजवाणी, हे मूव्ही-सीरिज होणार रिलीज
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Weekend Watch: शुक्रवारी चित्रपटगृहांबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होतात. या आठवड्याचा शुक्रवार 3 ऑक्टोबर देखील खास ठरणार आहे.
मुंबई : शुक्रवारी चित्रपटगृहांबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होतात. या आठवड्याचा शुक्रवार 3 ऑक्टोबर देखील खास ठरणार आहे. कारण हॉलीवूडपासून मल्याळम इंडस्ट्रीपर्यंत, थ्रिलरपासून कॉमेडीपर्यंत आणि रिअॅलिटी शो पासून ड्रामापर्यंत सगळा मसाला प्रेक्षकांना मिळणार आहे.
ओटीटीवर काय काय धमाका आहे पाहा:
मैंने प्यार किया (मल्याळम रोमँटिक अॅक्शन थ्रिलर)
प्रेम, धोकादायक ट्विस्ट आणि थरार! हृदू हारून आणि प्रीती मुकुंदन अभिनीत हा चित्रपट एका प्रेमकथेभोवती फिरतो, जिथे मुलगी मदुराईत अडकते आणि प्रियकर तिच्यासाठी लढा देतो. शुक्रवारपासून लायन्सगेट प्ले वर उपलब्ध आहे.
advertisement
बिग बॉस तमिळ सीझन 9
यावेळी होस्ट आहेत दमदार अभिनेता विजय सेतुपती. 18 स्पर्धक, 105 दिवसांचा प्रवास, 'ओन्नुमे पुरियाला' थीमखाली भन्नाट टास्क आणि प्रेक्षकांशी थेट संवादाचा तडका. प्रीमियर होतोय जिओ हॉटस्टार वर.
Steve (नेटफ्लिक्स ड्रामा)
ऑस्कर विजेता सिलियन मर्फी मुख्य भूमिकेत. एका सुधार शाळेच्या हेडला शाळा बंद पडणे, मानसिक आरोग्य, व्यसन आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतो. हा चित्रपट तरुणाईच्या भावविश्वाला भिडणारा ठरणार आहे.
advertisement
Monster: The Ed Gein Story (नेटफ्लिक्स)
रायन मर्फीची हिट Monster अँथॉलॉजीची नवी कहाणी. अमेरिकन सिरीयल किलर एड गेनच्या थरारक सत्यकथेवर आधारित. भीतीचा डोस हवा असेल तर ही मालिका चुकवू नका!
The Lost Bus (Apple TV+)
2018 च्या कॅलिफोर्निया कॅम्प फायरवर आधारित सत्यकथा. बस ड्रायव्हर आणि शिक्षिका 22 मुलांचे प्राण वाचवतात. मॅथ्यू मॅककोनाघे आणि अमेरिका फेरेरा यांच्या दमदार भूमिका. प्रेरणादायी, हृदयस्पर्शी आणि थरारकही.
advertisement
Old Dog New Tricks (Spanish Comedy – Netflix)
एका चिडखोर पशुवैद्याला अचानक पाळीव प्राण्यांच्या दुकानात नोकरी मिळते आणि त्याचे आयुष्य बदलते. मजेशीर, हलकी-फुलकी पण हृदयाला भिडणारी सीरिज.
या आठवड्याच्या ओटीटी रिलीजमध्ये थ्रिलर, प्रेमकथा, रिअॅलिटी शो, बायोपिक ड्रामा आणि कॉमेडी अशा सगळ्या चवींचा मेळ आहे. म्हणजे तुमचा शुक्रवार आणि वीकेंड मसालेदार बिंज वॉचिंगसाठी पर्फेक्ट ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Weekend Watch: वीकेंडला ओटीटीवर भन्नाट मेजवाणी, हे मूव्ही-सीरिज होणार रिलीज