गळ्यात पच्चास तोला अन् प्रथमेश परब बनला 'गोट्या गँगस्टर', 2 मिनिटं 24 सेकंदाचा VIDEO अजिबात चुकवू नका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता प्रथमेश परबचा गोट्या गँगस्टर बनून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याच्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्याचा त्यातील लुक चर्चेत आला आहे.
अभिनेता प्रथमेश परब अनेक धम्माल सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बालक पालक, टाइमपास, उर्फी सारख्या अनेक मराठी सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपल्या स्थान निर्माण केलं आहे. हाच प्रथमेश परब आता एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी प्रथमेश परब गोट्या गँगस्टर बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या नव्या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे.
मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा सिनेमा आहे. येच्या 26 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
advertisement
अभिनेता प्रथमेश परबसह या सिनेमात प्रवीण तरडे, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये धम्माल पाहायला मिळतेय. गोट्या असं प्रथमेशच्या कॅरेक्टरचं नाव आहे. गळ्यात पन्नास तोळे सोनं घालून, हातात बंदूक, कोयते घेऊन चाळकऱ्यांना धाक दाखवताना दिसतोय.
advertisement
याच दरम्यान काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्यानंतर विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या सिनेमात पहायला मिळणार आहे. अत्यंत खुसखुशीत गोष्ट, उत्तम अभिनेत्यांची फौज या सिनेमात आगे. सिनेमाच्या धम्माल ट्रेलरनं सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे.
advertisement
'बाबू बँड बाजा' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम सिनेमांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला 'गोट्या गँगस्टर' सिनेमा रिलीज होण्याआधीच त्यांचं अकाली निधन झालं. गोट्या गँगस्टर हा सिनेमा 26 डिसेंबरला रिलीज करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 1:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
गळ्यात पच्चास तोला अन् प्रथमेश परब बनला 'गोट्या गँगस्टर', 2 मिनिटं 24 सेकंदाचा VIDEO अजिबात चुकवू नका











