Raj Thackeray : 'तो झपाटलेला माणूस आहे', राज ठाकरेंनी सांगितलं कोण आहेत मराठी इंडस्ट्रीचे 'यश चोप्रा'?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्दर्शकाचं तोंड भरून कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी थेट यश चोप्रा यांचं उदाहरण दिलं आहे.
मुंबई 2009 साली प्रदर्शित झालेल्या मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटाने संपूर्ण इंडस्ट्री दणाणून सोडली होती. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर, प्रिया बापट आणि अभिजीत केळकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. अशातच या चित्रपटानंतर तब्बल 16 वर्षांनी सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत प्राप्त झाली.
अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
काही वेळापूर्वीच पुन्हा शिवाजी राजे या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३ मिनिटे ३४ सेकंदाच्या या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे.
advertisement
पुन्हा शिवाजी राजे सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, महेश खरंच झपाटलेला माणूस आहे. मागे त्याचा वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट पाहिला. तो जे पाहतो आणि करतो ते भव्य असतं. महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट बनत नाहीत. शेतकरी आत्महत्येचा विषय अशा प्रकारे मांडणं हे धाडस आहे.
advertisement
राज ठाकरेंनी केलं महेश मांजरेकरांचं कौतुक
यावेळी राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांची तुलना थेट यश चोप्रा यांच्याशी केली. ते म्हणाले, हिंदी चित्रपट सृष्टीतील यश चोप्रा आणि मराठीमध्ये महेश मांजरेकर हे निश्चित आहे. या चित्रपटाला महाराष्ट्र उचलून धरेल अशी खात्री आहे. आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक चित्रपटाचे लोकांनी उचलून धरले, पण हा सिनेमा वर्तमान आणि इतिहास असा दोन्ही विषयावर आधारित आहे.
advertisement
तथापि, या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अभिनेता विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाकडून प्रेक्षक आणि समिक्षकांना खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात रिलीज होणार असून तो बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 7:42 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Raj Thackeray : 'तो झपाटलेला माणूस आहे', राज ठाकरेंनी सांगितलं कोण आहेत मराठी इंडस्ट्रीचे 'यश चोप्रा'?