पुष्पा 2 चेंगराचेंगरी प्रकरणातून अल्लू अर्जुनची सुटका होणार? जामीन याचिकेवर कोर्टाचा मोठा निर्णय

Last Updated:

pushpa 2 stampede case allu arjun : अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जावर कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. हैदराबादमधील स्थानिक न्यायालयात 3 जानेवारी 2024 रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन
मुंबई : अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट 'पुष्पा-2'च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात, अभिनेत्याविरोधात दाखल एफआयआरमधील आरोपी अभिनेता अल्लू अर्जुनच्या नियमित जामिनावरील निर्णय आता पुढे ढकलण्यात आला आहे. न्यायालयाने हा निर्णय 3 जानेवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. अल्लू अर्जुन शुक्रवारी हैदराबाद न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर झाला. या प्रकरणातील आरोपी क्रमांक 11 म्हणून नाव असलेल्या अल्लू अर्जुनने नियमित जामिनासाठी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता हैदराबादमधील स्थानिक न्यायालयात 3 जानेवारी 2024 रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. रविवारी व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर ही माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले, “ब्रेकिंगः अल्लू अर्जुनच्या जामीन सुनावणीचा निर्णय 3 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
advertisement
न्यायालयाने सुनावणी 30 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या नियमित जामीन याचिकेवर नामपल्ली न्यायालय 3 जानेवारी रोजी निकाल देणार आहे. सोमवारी न्यायालयाने याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आणि पोलिसांनी दाखल केलेला प्रतिवाद ऐकून घेतला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
advertisement
या याचिकेवर न्यायालयाने 27 डिसेंबर रोजी सुनावणी केली. पोलिसांनी जामीन अर्जावर प्रतिवादी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला असल्याने न्यायालयाने सुनावणी 30 डिसेंबरपर्यंत तहकूब केली होती.
दरम्यान, अलीकडेच हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनचीही याप्रकरणी चौकशी केली. वृत्तानुसार, पोलीस अधिकारी अभिनेत्याच्या अंतरिम जामीनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्याचा दावा आहे की अल्लू अर्जुनला 4 डिसेंबर रोजी थिएटर सोडण्यास सांगितले होते, परंतु त्याने नकार दिला, ज्यामुळे नंतर चेंगराचेंगरी झाली.
advertisement
दरम्यान, आंदोलकांनी न्यायाच्या मागणीसाठी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर निदर्शनेही केली. त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले आणि घराच्या काही भागाचेही नुकसान केले. या घटनेनंतर अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
पुष्पा 2 चेंगराचेंगरी प्रकरणातून अल्लू अर्जुनची सुटका होणार? जामीन याचिकेवर कोर्टाचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement