हार घालण्यासाठी झुकले आशुतोष राणा, रेणुका शहाणेंनी डोळ्यांनी केला असा इशारा की..., VIDEO होतोय व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Renuka Shahane- Ashutosh Rana Varmala Video : आशुतोष आणि रेणुका शहाणे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांमधील प्रेमाचं अतुट नातं पाहून चाहतेही भारावलेत.
मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा 'उत्तर' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या स्मितहास्यानं आणि सुंदर अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. रेणुका शहाणे आजही प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री आहेत. पण अभिनेत्री होण्यापलिकडे रेणुका यांचं एक वेगळं जग आहे. त्या आधी गृहिणी, पत्नी आणि आई आहेत. त्यांच्या आयुष्यात अभिनेत्री असणं हे दुसऱ्या स्थानी आहेत. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या रेणुका शहाणे जेव्हा आशुतोष राणा यांच्या पत्नी असतात तेव्हा चित्र काही वेगळं असतं.
रेणुका शहाणे यांनी अभिनेते आशुतोष राणा यांच्याबरोबर लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. लग्नानंतर त्या दोन मुलांच्या आई झाल्या. मुलं मोठी झाल्यानंतर रेणुका शहाणे अनेक वर्षांनी पुन्हा सिनेमांत काम करू लागल्या. रेणुका आणि आशुतोष यांचं लव्ह मॅरेज. त्यांच्यातील प्रेमाचा बंध आजही कायम आहे. ते जेव्हा केव्हा सगळ्यांसमोर येतात तेव्हा ते नव्यानेच एकमेकांच्या प्रेमात पडले आहे असं जाणवतं. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
( 'माझ्यासोबत लग्न कर, पैसे देईन', रेणुका शहाणेंकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी, आईही झाली शॉक )
अभिनेते आशुतोष राणा यांनी नुकताच त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला त्यांनी रेणुका यांच्याबरोबर मिळून केक कापला. केक कापण्यापूर्वी दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या. या क्षण पाहण्यासारखा होता. दोघांच्या प्रेमात एकमेकांसाठी किती आदर आहे हे पाहायला मिळालं.
advertisement
advertisement
व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांच्या हातात वरमाला आहेत. दोघेही एकमेकांना हार घालायला जातात. आधी रेणुका हार घालण्यासाठी पुढे येतात, तोच आशुतोष राणा हार घालण्यासाठी खाल झुकतात. खाली झुकलेल्या आशुतोष राणांकडे रेणुका शहाणे पाहतात. दोघांमध्ये नजरेनं संवाद होतो. रेणुका शहाणे लटका चेहरा करून त्यांच्याकडे पाहतात तोच आशुतोष राणा पुन्हा उभे राहतात. रेणुका शहाणे त्यांच्या गळ्यात वरमाला घालतात. त्यानंतर आशुतोष राणा रेणुका यांना वरमाला घालतात. वरमाला घालताना दोघांनी एकमेकांना आदरपूर्वक नमस्कार केला.
advertisement
आशुतोष आणि रेणुका शहाणे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांमधील प्रेमाचं अतुट नातं पाहून चाहतेही भारावलेत. रेणुका आणि आशुतोष यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलं आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 11:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हार घालण्यासाठी झुकले आशुतोष राणा, रेणुका शहाणेंनी डोळ्यांनी केला असा इशारा की..., VIDEO होतोय व्हायरल


