2 तास रिहर्सल अन् 'निगाहें मिलाने को जी चाहता है...' कोणाच्या प्रेमात 'सैराट' झाली रिंकू राजगुरू? VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru Dance : 'निगाहें मिलाने को जी चाहता है...' म्हणत रिंकू राजगुरू चाहत्यांच्या भेटील आली आहे. तिचा नवा व्हिडीओ व्हायरल होतोय.
महाराष्ट्रातील तरुणांच्या मनावर राज्य आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू. सैराट सिनेमातून महाराष्ट्राला आर्ची म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू मिळाली. सैराटची रिंकू ते आताची आर्ची यांच्यात खूप फरक पाहायला मिळतोय. सैराट सिनेमानंतर रिंकूने स्वत:मध्ये खूप बदल केला आहे. फक्त अभिनय नाही तर रिंकूने तिचा मोर्चा डान्सकडेही वळवला आहे. काही दिवसांआधी रिंकू 'सैराट' सिनेमातील गाण्यावर थिरकली होती. रिंकूचा डान्स सर्वांना आवडला होता. त्यानंतर रिंकू आता 'निगाहें मिलाने को जी चाहता है...' म्हणत पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
रिंकू राजगुरूने अभिनेत्री 'निगाहें मिलाने को जी चाहता है...' या गाण्यावर डान्स केला आहे. रिंकूची नृत्यातील अदाकारी पहिल्यांदाच या व्हिडीओच्या निमित्तानं पाहायला मिळाली आहे. रिंकूची आतापर्यंत कधीच पाहायला न मिळालेली बाजू या निमित्तानं पाहायला मिळाली आहे.
advertisement
लावणी किंग आणि कोरिओग्राफर आशिष पाटीलबरोबर रिंकूने डान्स व्हिडीओ केला आहे. आशिषच्या तालमीत रिंकू देखील आदाकारीचं शिक्षण घेतेय. आशिष आणि रिंकूच्या जोडीला चाहत्यांनी पसंती दिली आहे. या डान्सचं खास वैशिष्ट्ये म्हणजे रिंकू आशिषकडे फक्त दोन तासात हा डान्स शिकला आहे. दोन तासांची रिअसल आणि त्यानंतर लगेच डान्स शूट करण्यात आला.
advertisement
advertisement
"बस गया है कोई इस दिल में कहें या ना कहें… माझी अनपेक्षित बाजू शेअर करतेय. फक्त 2 तासांची रिहसल आणि इतकं सुंदर शूट केल्याबद्दल आशिष खूप थँक्यू", असं कॅप्शन देत रिंकूने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रिंकूच्या पोस्टवर आशिषने कमेंट करत तिचं कौतुक केलंय. त्याने लिहिलंय, "थँक्यू रिंकू तुझ्या डेडिकेशनसाठी आणि पेशन्ससाठी. गॉड ब्लेस यू". अमृता खालविलकरने देखील "क्या बात है" असं म्हणत हॉर्ट इमोजी शेअर केलेत.
advertisement
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तिचा 'आशा' हा सिनेमा 19 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होतोय. हा सिनेमा अनेक फेस्टिव्हल्समध्ये दाखवण्यात आला आहे. या सिनेमातील भुमिकेसाठी रिंकूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे रिंकूसाठी हा सिनेमा अत्यंत खास आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
2 तास रिहर्सल अन् 'निगाहें मिलाने को जी चाहता है...' कोणाच्या प्रेमात 'सैराट' झाली रिंकू राजगुरू? VIDEO


