Rinku Rajguru : नऊवारी साडी, नथ अन् चंद्रकोर ! दसऱ्याला रिंकूचा मराठमोळा साज, ब्लाऊजवरची नक्षी ठरली खास, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru Photo : अभिनेत्री रिंकू राजगुरूनं अस्सल मराठमोळ्या अंदाजात दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्यात. रिंकूचे फोटो पाहिलेत का!
आज सर्वत्र दसरा आणि विजयदशमीचा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच मराठमोळ्या अभिनेत्रीनं खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्यात,

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मिडियावर सक्रीय असते. रिंकूने दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्यात.

अभिनेत्री रिंकू राजगुरूनं अस्सल मराठमोळा साज केला आहे. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि नऊवारी साडीत रिंकूचा मराठमोळा ठसका पाहायला मिळतोय.
advertisement

दसरा आणि विजयादशमी च्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा असं म्हणत रिंकूने सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात.

रिंकू साडी लवर आहे. नेहमीच वेगवेगळ्या साड्यांमध्ये ती फोटोशूट करत असते.
advertisement

पण यावेळी नऊवारी साडीत रिंकूनं केलेलं फोटोशूट विशेष चर्चेत आलं आहे. रिंकूचा एक वेगळाच अंदाज यात पाहायला मिळतोय.

'सुंदर', 'अप्रतिम', 'किती गोड', 'महाराष्ट्राची सुंदरा' अशा कमेंट करत चाहत्यांनी रिंकूचं कौतुक केलं आहे. यावेळी रिंकूच्या ब्लाऊजने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 1:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rinku Rajguru : नऊवारी साडी, नथ अन् चंद्रकोर ! दसऱ्याला रिंकूचा मराठमोळा साज, ब्लाऊजवरची नक्षी ठरली खास, PHOTO