Saif Ali Khan : हल्ल्यात जेहलाही लागलेला चाकू, सैफकडून शॉकिंग खुलासा; सांगितला त्या रात्रीचा थरार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Saif Ali Khan : जानेवारी महिन्यात सैफवर हल्ला झाला होता. त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी सैफने या प्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : जानेवारी महिन्यात अभिनेता सैफ अली खानच्या घरात झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड बिथरलं होतं. सैफच्या घरात मध्यरात्री एक अज्ञात व्यक्ती शिरली. त्याने सैफवर हल्ला केला ज्यात सैफ गंभीररित्या जखमी झाली. घरात शिरलेल्या हल्लेखोराने सैफसह त्याचा मुलगा जेहला सांभाळणाऱ्या नॅनीवर देखील हल्ला केला होता.
जानेवारी महिन्यात सैफवर हल्ला झाला होता. त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी सैफने या प्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे. या हल्ल्यात त्याचा मुलगा जेहला देखील लागलं होतं. हल्ला झाला तेव्हा घरात नेमकं काय काय झालं हे त्याने सांगितलं. सैफ अली खान नुकताच ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या टू मच टॉकमध्ये आला होता. हल्ल्याच्या त्या रात्री घरात नेमकं काय झालं हे त्याने सांगितलं.
advertisement
सैफ म्हणाला, "त्या दिवसी करीना बाहेर होती. मी दोन मुलांसोबत फिल्म संपवली. आम्हाला झोपायला खूप उशीर झाला होता. जवळपास 2 वाजले होते. करीना परत आली त्यानंतर आम्ही थोडं बोललं आणि झोपायला निघालो होतो तेवढ्यात आमची मेड आली आणि म्हणाली, जेह बाबाच्या रुममध्ये कोणीतरी आहे. त्याच्या हातात चाकू आहे आणि तो पैसे मागतोय. हे ऐकून मी बेडवरून उडी मारून जेहच्या रुममध्ये गेलो. रुममध्ये अंधार होता मी घुसलो पाहिलं तर तो बेडच्या इथे चाकू घेऊन उभा होता."
advertisement
सैफचं बोलणं ऐकून अक्षयाने त्याला काळजीने विचारलं की, त्याने चाकू जेहच्या दिशेने केला होता का? सैफ म्हणाला, "हो तो सारखा इतके तिकडे होत होता त्यामुळे जेह आणि नॅनीला दोन कट लागले."
सैफ पुढे म्हणाला, "मला वाटलं तो माझ्यापेक्षा बारिक आहे म्हणून मी त्याच्या अंगावर गेलो. नंतर जेह मला बोलला की, तुम्ही थेट फाइट किंवा लाथ मारायला पाहिजे होती. मी त्याच्या अंगावर धावून गेलो आणि आमच्यात झटापटी सुरू झाली. त्याच्याकडे दोन चाकू होते आणि त्याने मला मारायला सुरूवात केली."
advertisement
सैफनं सांगितलं, "मी माझी ट्रेनिंग आठवली मी त्याला काही मुक्के मारले तेव्हाच त्याने माझ्या पाठीत जोरात वार केला. सगळे खोलीतून बाहेर आले. या झटापटीत आमची डोमेस्टिक हेल्पर गीताच्या मदतीने त्याला माझ्यापासून दूर करण्यात मदत झाली. त्याने मला अनेक ठिकाणी कट मारले होते. त्यानंतर आम्ही रुम लॉक करून घेतला."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 4:58 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Saif Ali Khan : हल्ल्यात जेहलाही लागलेला चाकू, सैफकडून शॉकिंग खुलासा; सांगितला त्या रात्रीचा थरार