माणिकराव कोकाटेंची रम्मी व्हिडीओ प्रकरण रोहित पवारांना भोवणार, कोर्टाने दिले चौकशीचे आदेश
- Published by:Prachi Amale
Last Updated:
रम्मीच्या त्या व्हिडीओमुळे रोहित पवारांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई : माणिकराव कोकाटे रम्मी व्हिडीओ प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. कोकाटेंचा जबाब नोंदवल्यावर कोर्टाने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विधीमंडळात कोकाटेंचा व्हिडीओ कोणी काढला याचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणी माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
तत्कालीन कृषिमंत्री कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाईवर पत्ते खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका करत राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले अन् क्रीडा खाते सोपवले.
advertisement
व्हिडीओ कोणी काढला याचा तपास होणार
रम्मीच्या त्या व्हिडीओमुळे रोहित पवारांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. व्हिडीओ कोणी काढला आणि तो कसा व्हायरल झाला, याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे.पोलिसांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. व्हिडीओ कोणी काढला याचा तपास देखील होणार आहे.
advertisement
रोहित पवार यांना व्हिडीओ कोणी दिला?
नाशिकच्या न्यायालयात कोकाटे यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली. आपला व्हिडीओ कोणी काढला आणि तो रोहित पवार यांना कोणी दिला? तसेच तो व्हिडीओ त्यांनी व्हायरल का केला? असे अनेक प्रश्न
उपस्थित केले आहेत. आपली बदनामी केल्याप्रकरणी पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी न्यायालयाकडे वकिलांमार्फत केली होती. त्यानंतर आता कोर्टाने या संदर्भात आदेश दिले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी कोकाटे यांनी रोहित पवारांना नोटीस देखील बजावली. नोटीस बजावल्यानंतरही रोहित पवारांनी माफी मागितली नाही किंवा नोटिसीला उत्तर देखील दिले नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 4:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माणिकराव कोकाटेंची रम्मी व्हिडीओ प्रकरण रोहित पवारांना भोवणार, कोर्टाने दिले चौकशीचे आदेश