12th Result : बारावीचा रिझल्ट लागण्याआधीच रिंकु राजगुरूची मार्कशीट व्हायरल, आर्चीला 12वीत किती होते मार्क?

Last Updated:

Rinku Rajguru 12th Marksheet Viral : आज महाराष्ट्रात बारावीचा निकाल आहे. त्याआधीच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची बारावीची मार्कशीट व्हायरल झाली आहे. तिला बारावीत किती मार्क मिळाले होते माहितीये?

News18
News18
मुंबई : आज महाराष्ट्रात बारावीचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहतीचं फळ आज त्यांना मिळणार आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधुक वाढली आहे. निकालाचे क्षण जसजसे जवळ येत आहेत तसतशी सगळीकडेच उत्सुकता वाढली आहे. पण या धामधुमीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मार्कशीटनं मात्र सोशल मीडियावर आधीच एंट्री घेतली आहे. 'सैराट' चित्रपटातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची बारावीची मार्कशीट व्हायरल झाली आहे.
'सैराट' सिनेमातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या दमदार अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली. 'तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का, की इंग्लिशमध्ये सांगू?' हा तिचा डायलॉग आजही फेमस आहे. फक्त डायलॉग बोलण्यात नाही तर रिंकू अभ्यासातही हुशार आहे. रिंकूला बारावीत किती मार्क मिळाले होते माहितीये?
advertisement

दहावी आणि बारावीचा अभ्यास – सिनेमासोबत शिक्षणातही टॉप

रिंकूने दहावीची परीक्षा अकलूज येथील शाळेतून दिली होती. त्यावेळी 'सैराट'चे शूटिंग सुरू असल्याने तिला नियमित शाळेत जाता आलं नव्हतं. त्यामुळे तिने 10वीमध्ये 66.40% गुण मिळवले. मात्र, बारावीच्या परीक्षेसाठी रिंकूने अधिक मेहनत घेतली आणि तिला 82% गुण मिळाले.
advertisement

परिक्षा द्यायला रिंकूला होती टाइट सिक्युरिटी

'इंग्लिशमध्ये सांगू का?' असं डायलॉग देणाऱ्या रिंकूला बारावीत इंग्रजी विषयात 100 पैकी 54 गुण मिळाले. रिंकूने 12वीची परीक्षा सोलापूरजवळील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयात दिली होती. तिला बघण्यासाठी प्रचंड गर्दी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.
advertisement

फिटनेसकडे वाढलेलं लक्ष आणि बॉलिवूडकडे वाटचाल

दहावीला शूटिंगमुळे मिळालेल्या कमी मार्कांचं दु:ख रिंकूने 12वीत भरून काढलं. तिचा अभ्यास, अभिनय आणि मेहनत यामुळे ती अनेक तरुणींना प्रेरणा देणारी अभिनेत्री ठरली. रिंकूचं खरं नाव प्रेरणा आहे हे देखील याच व्हायरल मार्कशीटमध्ये सर्वांसमोर आलं. सैराटनंतर रिंकूने स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष दिलं. आता सैराटमधील रिंकू आणि आताची रिंकू यांच्यात खूप फरक पाहायला मिळतोय.
मराठी बातम्या/मनोरंजन/
12th Result : बारावीचा रिझल्ट लागण्याआधीच रिंकु राजगुरूची मार्कशीट व्हायरल, आर्चीला 12वीत किती होते मार्क?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement