Rinku Rajguru Grandmother : रिंकूची आई तर सगळ्यांनाच माहितीये, आजीला पाहिलंत का? नातीसाखरीच देते भारी पोझ

Last Updated:

rinku rajguru grandmother : रिंकूच्या आई-बाबांना तर सगळ्यांना पाहिलं आहे पण रिंकूच्या आजीला तुम्ही पाहिलंय का? कोण आहे रिंकूची आजी?

रिंकू राजगुरूची आजी
रिंकू राजगुरूची आजी
मुंबई : सैराट सिनेमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सगळ्यांच्या गळ्यातील ताईत आहे. अकलूज या छोट्याशा गावातून आलेली रिंकू राजगुरू आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातही ओळखली जाते. एका रात्रीत स्टार होण्याचं सुख काय असतं हे रिंकूने फार कमी वयात अनुभवलं. सैराट सारखा 100 कोटींचा डेब्यू सिनेमा केल्यानंतर रिंकूने अनेक मराठी सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं. रिंकूच्या आतापर्यंतच्या प्रवासात तिला तिच्या कुटुंबाची खूप मोठी साथ मिळाली आहे. रिंकू तिच्या यशाचं श्रेय नेहमीच तिच्या आई-बाबांना देते. रिंकूचे आई-बाबा तिच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. दोघांनी रिंकूबरोबर अनेक मुलाखती देखील दिल्या आहेत. रिंकूच्या आई-बाबांना तर सगळ्यांना पाहिलं आहे पण रिंकूच्या आजीला तुम्ही पाहिलंय का?
अभिनेत्री रिंकू राजगुरूची आजी देखील तिच्यासारखीच फोटोजेनिक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रिंकू राजगुरूच्या आईला तर सर्वांनी पाहिलं आहे. रिंकूची आई खूप स्ट्रिक्ट आहे असं रिंकूने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. तुम्ही रिंकूच्या आजीला पाहिलंय का? रिंकूची आजी म्हणजेच तिच्या वडिलांची आई. रिंकूला आजी आणि आजोबा दोन्ही आहेत. दोघेही अकलूजमध्ये राहतात. रिंकूची आजी आणि तिच्या आईचं खूप छान बॉन्डिंग आहे. रिंकू आणि तिच्या भावावरही तिची खूप प्रेम आहे.
advertisement
रिंकूच्या आईचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यास त्यावर रिंकूच्या संपूर्ण फॅमिलीचे फोटो पाहायला मिळतात. या फोटोंवरून एक गोष्ट लक्षात येते की राजगुरू कुटुंबांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. रिंकूच्या आईने सासूबाईंबरोबरचा म्हणजेच रिंकूच्या आजीबरोबरचा एक फोटो आहे. ज्यात दोघींनी हनुवटीवर हात ठेवून फोटो क्लिक केला आहे.
advertisement
रिंकूच्या आजीने निळी नऊवारी साडी नेसली आहे. नाकात नथ, कपाळावर कुंकू, डोक्यावर पदर असा साजिरा पारंपरिक वेशात त्या आहेत.
रिंकूच्या आई आणि वडिलांच्या लग्नाला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झालीत. लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा लग्न केलं. दुसऱ्यांदा लग्न केल्याचे फोटो रिंकूच्या आईने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rinku Rajguru Grandmother : रिंकूची आई तर सगळ्यांनाच माहितीये, आजीला पाहिलंत का? नातीसाखरीच देते भारी पोझ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement