समंथासोबत घटस्फोट होत नाही तोच नागा चैतन्यच्या घरी आली शोभिता, अशी सुरू झाली फिल्मी Love Story
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Naga Chaitanya-Sobhita Wedding: समंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर काही महिन्यांनी नागा चैतन्यने शोभिताचा त्याच्या हैदराबादच्या घरी पाहुणचार केला.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज म्हणजेच बुधवारी, ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. नागार्जुन यांच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. गेली तीन वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत. आज त्यांचा पती-पत्नी म्हणून नवा प्रवास सुरू होणार आहे.
नागा चैतन्यचे पहिले लग्न अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोबत झाले होते. बराच काळ डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये लग्न केले. दुर्दैवाने, या जोडप्याने ऑक्टोबर २०२१ मध्ये वैयक्तिक मतभेदांचा हवाला देऊन विभक्त होण्याची घोषणा केली आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता तो अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न करणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊया नागा चैतन्य आणि शोभिताची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली.
advertisement
२०२२ साली सुरू झाल्या नागा-शोभिताच्या डेटिंगच्या चर्चा
समंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर काही महिन्यांनी नागा चैतन्यने शोभिताचा त्याच्या हैदराबादच्या घरी पाहुणचार केला. काही रिपोर्ट्समध्ये सांगितल्यानुसार, ही एक मैत्रीपूर्ण भेट होती. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
Naga Chaitanya-Sobhita Wedding: होणाऱ्या नवरीसाठी समांथाची खास पोस्ट, म्हणाली, "सगळ्यात गोड व्यक्ती"
advertisement
२०२३ साली एकत्र लंडन व्हेकेशनला गेले
मिशेलिन स्टार शेफ सुरेंद्र मोहन यांनी २०२३ साली त्यांच्या लंडन रेस्टॉरंटमधील नागा चैतन्यसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये एका सोफ्यावर शोभिता बसलेली दिसली. तथापि, हा फोटो लगेचच डिलीट करण्यात आला होता. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की या व्हेकेशनमध्येच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
advertisement
याच वर्षी शोभिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जंगल सफारीचे फोटो शेअर केले होते. एक दिवसानंतर चैतन्यनेही त्याच ठिकाणचे काही फोटो शेअर केले होते. यावेळी तो सूर्यास्ताचा आनंद घेत होता. त्याच्या एका महिन्यानंतर हे कपल सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी यूरोपला गेले होते.
९ ऑगस्टला नागा चैतन्य आणि शोभिताचा साखरपुडा झाला
९ ऑगस्ट रोजी या जोडप्याने साखरपुडा केला. चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुन यांनी लिहिले, "माझा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा साखरपुडा झाल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे." या जोडप्याच्या लग्नाआधीच्या फंक्शन्सची सुरुवात डिसेंबरमध्ये झाली होती ज्यात रात्र स्थापनम, मंगलासनम आणि पेल्ली कूथुरु सारख्या समारंभांचा समावेश होता.
advertisement
आज, बुधवार, ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पारंपारिक रितीरिवाजांनुसार नागा आणि शोभिता विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्या लग्नाचे विधी ८ तास चालणार आहेत. चिरंजीवी, अल्लू अर्जुन, रामचरण यांच्यासह अनेक स्टार्स या जोडप्याच्या पारंपारिक लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 2:03 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
समंथासोबत घटस्फोट होत नाही तोच नागा चैतन्यच्या घरी आली शोभिता, अशी सुरू झाली फिल्मी Love Story