Samantha Prabhu : घटस्फोटाच्या 4 वर्षांनी समांथा प्रभूच्या आयुष्यात मोठा आनंद, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुड न्यूज

Last Updated:

Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूने आज इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या सूटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोंसह तिने चाहत्यांसोबत तिचा आनंद शेअर केला आहे.

News18
News18
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आता नव्या, आलिशान घराची मालकीण झाली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता काही दिवसांनंतर, सामंथाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर गृहप्रवेशाचे खास आणि अत्यंत साधेसोपे फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे.

लाल सूटमध्ये पूजा, पण घर 'रॉयल'!

सामंथा रुथ प्रभूने आज इंस्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती लाल रंगाचा सूट परिधान करून अत्यंत शांत आणि साध्या पद्धतीने गृहप्रवेशाच्या पूजेला बसलेली दिसत आहे. तिच्या या साधेपणाने चाहत्यांना पुन्हा एकदा तिचे फॅन बनवले आहे.
advertisement
इतर फोटोंमध्ये तिने आपल्या भव्य हॉल रूमची, सुंदर पूजा खोलीची आणि तिच्या लाडक्या पाळीव श्वानासोबतच्या वेगवेगळ्या जागांची झलक दाखवली आहे. एका फोटोत ती तिच्या घरात असलेल्या जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती आपल्या पेट्ससोबत खेळत आहे. सामंथाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
advertisement
advertisement

नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर उचलली मोठी पाऊले

सामंथाने व्यावसायिक आयुष्यात मोठी उंची गाठली आहेच, पण वैयक्तिक आयुष्यातही ती खूप पुढे गेली आहे. अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सामंथाने तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता तिने बॉलिवूडमध्येही जोरदार एंट्री केली. अभिनेत्री म्हणून तिने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता ती लवकरच 'रक्त ब्रह्मांड : द ब्लडी किंगडम' मध्ये दिसणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Samantha Prabhu : घटस्फोटाच्या 4 वर्षांनी समांथा प्रभूच्या आयुष्यात मोठा आनंद, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुड न्यूज
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement