सैफ अली खानवर नाराज राज्याचे कॅबिनेट मंत्री, करीना कपूरचं नाव घेत म्हणाले 'जेव्हा तिला पाहतो...'

Last Updated:

नागालँडचे उच्च शिक्षण मंत्र्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांसोबतच सिनेमा आणि बॉलिवूड कलाकारांवर अतिशय मजेशीर आणि प्रामाणिकपणे उत्तरे दिली.

News18
News18
मुंबई : राजकारण्यांमध्येही एक 'दिलखुलास' कलाकार दडलेला असतो, याचा अनुभव नुकताच 'न्यूज१८ इंडिया'च्या 'चौपाल' कार्यक्रमात आला. नागालँडचे उच्च शिक्षण मंत्री तेनजेम इमाना अलॉन्ग (Temjen Imna Along) यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांसोबतच सिनेमा आणि बॉलिवूड कलाकारांवर अतिशय मजेशीर आणि प्रामाणिकपणे उत्तरे दिली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मुंबईत काढली ११ वर्षे!

पत्रकार प्रतीक त्रिवेदी यांनी जेव्हा मंत्र्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. 'तुम्हाला आरसा पाहायला आवडत नाही का? तुम्ही मेकअपलाही नकार दिला?' या प्रश्नावर मंत्री म्हणाले, "मी सकाळ-सकाळ आरसा नाही बघत." तेनजेम इमाना यांनी आपण मुंबईत जवळपास ११ वर्षे राहिल्याचे सांगितले. 'अभिनेता बनण्याची इच्छा झाली नाही?' या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर तर खूपच मजेदार होते. ते म्हणाले, "मला इमारतीच्या लिफ्टमध्ये अनेकदा संधी मिळाली. सिनेमावाल्यांना मी आवडायचो, कारण माझं वजन जास्त होतं. अनेकदा लोकांनी विचारलं, पण माझं मन झालं नाही."
advertisement

करिना कपूर ही आवडती अभिनेत्री

त्रिवेदी यांनी जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या नायिकेबद्दल विचारले आणि 'तुमच्यासमोर ती बसलेली असेल, तर काय बोलाल?' असा प्रश्न विचारला, तेव्हा तेनजेम इमाना यांनी जराही वेळ न घालवता थेट करीना कपूर खानचे नाव घेतले. करीनाचे नाव घेताच त्यांनी जो पुढचा खुलासा केला, त्यावर हॉलमधील सगळेच हसले. ते म्हणाले, "सैफ अली खानवर मी खूप नाराज आहे."
advertisement
या नाराजीचे कारण विचारले असता, त्यांनी मिश्किलपणे ते सांगण्यास नकार दिला आणि हसून म्हणाले, "मोदीजी ओरडतील!" त्रिवेदी यांना कारण सांगण्याचा आग्रह केला, पण मंत्रीजींनी 'कोपऱ्यात सांगतो' म्हणून नकार दिला.
करीना कपूरबद्दल बोलताना मंत्री पुढे म्हणाले, "करीना कपूरला पाहतो, तेव्हा खूप छान वाटते." त्यांच्या या निरागस आणि मनमोकळ्या उत्तरावर कार्यक्रमातील सगळे पाहुणे फिदा झाले. तेनजेम इमाना यांना सिनेमाचीही खूप आवड आहे. आवडत्या चित्रपटांबद्दल विचारले असता त्यांनी ९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट 'कयामत से कयामत तक' याचे नाव घेतले. याशिवाय त्यांना सलमान खानचा 'मैने प्यार किया' आणि सनी देओलचा 'बॉर्डर' हे चित्रपटही खूप आवडतात.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सैफ अली खानवर नाराज राज्याचे कॅबिनेट मंत्री, करीना कपूरचं नाव घेत म्हणाले 'जेव्हा तिला पाहतो...'
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement