Swanandi Tikekar Wedding : वरमाई जोमात! एकुलत्या एक मुलीच्या लग्नात गायिका आरती अंकलीकरांचा डान्स, Video
- Published by:Minal Gurav
Last Updated:
स्वानंदी आणि आशिष यांच्या लग्नाआधीच्या सगळ्या विधी एकत्र पार पडल्या. स्वानंदीच्या मेहंदी सोहळ्यात घास बँड बाजा अरेंज करण्यात आला होता.
मुंबई, 25 डिसेंबर : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मराठी कलाकारांची लगीन घाई सुरू आहे. अभिनेता पियुश रानडे आणि अभिनेत्री सुरूची अडारकर यांच्यानंतर अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकर लग्न करतेय. स्वानंदी आणि इंडियन आयडिअल फेम आशिष कुलकर्णी यांची लगीन घाई सुरू झाली आहे. पुण्यात दोघांचं लग्न होतंय. लग्नाआधीच्या सगळ्या विधी सुरू झाल्यात. नुकतीच स्वानंदी आणि आशिष यांची मेहंदी आणि हळद पार पडली. स्वानंदीच्या मेहंदी कार्यक्रमात तिच्या आई-वडिलांनी डान्स करत सर्वांचं लक्ष वेधलं.
स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी. आपल्या एकुलच्या एक मुलीच्या लग्नासाठी उदय टिकेकर आणि आरती टिकेकर प्रचंड खुश आणि उत्साही आहेत. लेकीची पाठवणी करण्याआधी तिच्याबरोबर सगळे क्षण ते आनंदानं एन्जॉय करताना दिसले.
हेही वाचा - मेहंदी सजली गं! स्वानंदीच्या हातावर रंगली आशिषच्या नावाची मेहंदी; 'आनंदी' जोडप्याचे फोटो समोर
advertisement
स्वानंदी आणि आशिष यांच्या लग्नाआधीच्या सगळ्या विधी एकत्र पार पडल्या. स्वानंदीच्या मेहंदी सोहळ्यात घास बँड बाजा अरेंज करण्यात आला होता. मेहंदी सोहळ्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात स्वानंदी मेहंदी काढायला बसली आहे आणि उदय टिकेकर आणि आरती टिकेकर आनंदात नाचताना दिसत आहेत. 60 वर्षांच्या आरती टिकेकर यांच्या चेहऱ्यावर लेकीच्या लग्नाची उत्सुकता आणि आनंद दिसून आला.
advertisement
advertisement
मेहंदी सोहळ्यानंतर रात्री स्वानंदी आणि आशिष यांचा संगीत सोहळा देखील झाला. संगीतमध्ये स्वानंदीचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेत. संगीतमध्ये दोघे रोमँटिक होताना देखील दिसले आहेत. अस्सल पारंपरिक पद्धतीनं दोघांच्या लग्नाचे सगळे विधी पार पडत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2023 9:27 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Swanandi Tikekar Wedding : वरमाई जोमात! एकुलत्या एक मुलीच्या लग्नात गायिका आरती अंकलीकरांचा डान्स, Video