तानाजीचा 'चुलत्या' होणार गोंधळाचा म्होरक्या! अभिनयासोबत गाणार गोंधळ, हा अभिनेता कोण?
- Published by:Suraj Yadav
- Written by:Suraj Yadav
Last Updated:
तानाजी या हिंदी सिनेमातील 'चुलत्या' दिसणार अभिनया सोबत गाणार गोंधळ. गोंधळातील मुख्य म्होरक्याची भुमिका तो साकारणार आहे.
तानाजी या हिंदी सिनेमातून घराघरात पोहचणारा हा मराठमोळ्या अभिनेत्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. अनेक मराठी सिनेमातून काम केले आहे. तो वेगवेगळ्या भुमिकेतुन आपल्याला कायमच पाहायला मिळाला आहे. त्याची अभिनयाची एक बाजू सर्वांनाच माहिती आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्याची अजून एक बाजु सांगणार आहे .
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजेच कैलास वाघमारे. तो उत्तम अभिनेता आहेत पण त्याची दुसरी बाजू म्हणजे तो एक उत्तम गायनही करतो. त्याने आपली सुरुवात नाटकातून केली. महत्वाचं सांगायचं म्हणजे हे की, आता नवीन येणाऱ्या 'गोंधळ' या मराठी सिनेमात त्याने चक्क गोंधळ गायला आहे. तो या सिनेमात गोंधळातील म्होरक्याची भुमिका साकारतोय. हा गोंधळ कुठल्याही स्टुडिओमध्ये रेकॅार्ड न करता डायरेक्ट ऑन सेट गायलेला आहे. हे सगळ्यात महत्वाचं. 'मली मल्यावं मातले फार' असा गोंधळ म्हणतानाही टीझर मध्ये ऐकायला मिळत आहे. हा पट्टा आता हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर पुन्हा आपल्या मातीशी नाळ जुळलेल्या सिनेमात झळकणार आहे. असे न्युज 18 लोकमतशी बोलताना कैलासने सांगितले
advertisement
हल्लीच मराठी 'गोंधळ' सिनेमाचा एक मिनिटाचा टीझर आउट झाला आहे. या टीझरमध्ये किशोर कदम यांचा आवाज आणि फेस समोर दिसतो आहे . गोंधळाचं गाणही ऐकू येते आहे आणि महत्वाचं खेडेगावातील नवरा नवरीच्या आयुष्यातील विघ्न दूर होण्यासाठी साजरा होणारा गोंधळ, ही त्यांची श्रद्धा आहे हे ही दिसतेय .आपल्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीशी असलेली आणि जुळलेली नाळ या गोंधळातून दिसणार आहे.
advertisement
‘गोंधळ’ सिनेमाची कथा,पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिली असून, चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. गायन अजय गोगावले,आर्या आंबेकर,कैलास वाघमारे आणि अभिजीत कोसंबी यांनी केले आहेत. सिनेमात किशोर कदम, इशिता देशमुख आणि योगेश सोहनी यांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा चित्रपट 14 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
advertisement
कैलास फिल्मसोबतच लोकशाहीर संभाजी भगत यांची संकल्पना असलेले,राजकुमार तांगडे लिखित , संभाजी तांगडे आणि कैलास वाघमारे दिग्दर्शीत माऊथ पब्लिसीटीचे पुनःरंभाचे 'शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला' या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे.

Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
तानाजीचा 'चुलत्या' होणार गोंधळाचा म्होरक्या! अभिनयासोबत गाणार गोंधळ, हा अभिनेता कोण?