हे मां! माताजी! तारक मेहतामध्ये नव्या दया बेनची एंट्री? प्रोमो VIDEO VIRAL
- Published by:Minal Gurav
Last Updated:
fact check tmkoc daya ben Promo : अनेक वेळा तारक मेहतामध्ये दिशा वकानीच्या परत येण्याच्या बातम्या आल्या. पण प्रत्येक वेळी प्रेक्षकांना निराशा झाली. दरम्यान एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे ज्या दयाबेन परत आल्याचं दिसतंय.
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील लोकप्रिय शो आहे. हा शो पाहणाऱ्या सगळ्यांना नेहमीच एकच प्रश्न पडतो तो म्हणजे दया बेन कधी परत येणार? दिशा वकानीने साकारलेल्या या भूमिकेला शोमधून बाहेर पडून सात वर्ष झाली आहे. मात्र तरीही ती परत येण्याकडे सगळेच आस लावून बसले आहेत. अनेक वेळा दिशा वकानीच्या परत येण्याच्या बातम्या आल्या. पण प्रत्येक वेळी प्रेक्षकांना निराशा झाली. दरम्यान एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे ज्या दयाबेन परत आल्याचं दिसतंय.
दयाबेनच्या कमबॅकचा प्रोमो
अलीकडेच सोशल मीडियावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या नवीन प्रोमोचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेची ओळख नवीन दयाबेन म्हणून करून दाखवली जात आहे. व्हिडिओमध्ये ती फोनवर बोलताना आणि अहमदाबाद ते मुंबई प्रवास करताना दिसते. व्हिडिओच्या शेवटी असित मोदी यांची झलक देखील दिसते ज्यामध्ये ते म्हणतात, "आम्ही वचन देतो की दया भाभी लवकरच शोमध्ये दिसतील."
advertisement
व्हिडिओची सत्यता
त्यानंतर अनेक लोकांनी हा व्हिडिओ खरं आहे की नाही याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. तपासल्यानंतर हे समजले की हा व्हिडिओ बनावट आहे आणि तो AI द्वारे तयार करण्यात आलेला आहे. शोमध्ये 'दयाबेन'च्या कमबॅकची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
advertisement
advertisement
दिशा परत येणे कठीण - असिद मोदी
काही महिन्यांपूर्वी असित मोदी यांनी न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की दिशा वकानी सध्या शोमध्ये परत येणे कठीण आहे. त्यांनी सांगितले की, "लग्नानंतर महिलांचं आयुष्य बदलतं. लहान मुलांसोबत काम करणे आणि घर सांभाळणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. तरीही मी सकारात्मक आहे आणि मला विश्वास आहे की देव चमत्कार करेल."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2025 4:39 PM IST