'घटस्फोट घेऊन नाव खराब करू नका!' शोच्या सेटवरच अविका गौरने बांधली लग्नगाठ, नेटकऱ्यांनी लग्नाच्या दिवशीच सुनावलं

Last Updated:

Avika Gor wedding : ‘बालिका वधू’ फेम अविका गौरने मिलिंद चंदवानीसोबत ‘पती पत्नी और पंगा’ सेटवर लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

News18
News18
मुंबई : ‘बालिका वधू’ या मालिकेमुळे ‘आनंदी’ या नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हिने अखेर तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे! गेल्या अनेक दिवसांपासून अविकाच्या लग्नाची चर्चा होती. अखेर तिचं हे स्वप्न ‘पती पत्नी और पंगा’ या शोच्या सेटवर पूर्ण झालं असून, या विवाह सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाले आहेत.
अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांनी सात फेरे घेतले असून, इंटरनेटवर आलेल्या व्हिडिओंमध्ये अविका आपला मांग टिका बाजूला सारून, कपाळावरचं सिंदूर आनंदाने दाखवताना दिसत आहे. ११ ऑक्टोबरला या लग्नाचं टेलिकास्ट कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर होणार आहे.
advertisement
अविकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचं लहानपणीचं स्वप्न होतं की, तिचं लग्न एकतर सगळ्या जगाने पाहावं, किंवा मग तिने गुपचूप कोर्ट मॅरेज करावं. तिची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. मिलिंद अविकापेक्षा ६ वर्षांनी मोठा आहे.

चाहत्यांनी शुभेच्छासोबत मारले टोमणे

लग्नानंतर अविका आणि मिलिंदने पापाराझींची भेट घेऊन त्यांना मिठाई वाटली. यावेळी ढोल-ताशांच्या तालावर दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खूप डान्स केला. सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा मिळत असल्या, तरी काही लोकांनी या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका युजरने कमेंट केली, “लग्न केलं आहे, तर ते निभवा! घटस्फोट घेऊन नाव खराब करू नका!” तर दुसऱ्याने, “हे फक्त शोसाठी नाटक आहे” असं म्हणून टोमणा मारला.
advertisement
advertisement
यापूर्वी अविकाचं नाव तिचा सह-अभिनेता मनीष रायसिंघनसोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्याबद्दल अशाही अफवा पसरल्या होत्या की त्यांचं एक सीक्रेट बाळही आहे, पण अविकाने नंतर स्पष्ट केलं होतं की, मनीष तिच्या वडिलांच्या वयाचा आहे.
टीव्हीवर याआधीही अनेक कलाकारांची लग्नं झाली, पण ती फार यशस्वी झाली नाहीत. त्यामुळे अविका-मिलिंदचं हे नातं किती टिकतं, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'घटस्फोट घेऊन नाव खराब करू नका!' शोच्या सेटवरच अविका गौरने बांधली लग्नगाठ, नेटकऱ्यांनी लग्नाच्या दिवशीच सुनावलं
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement