दिवाळीच्या मुहूर्तावर पूर्ण होणार 'ठिपक्यांची रांगोळी'; अप्पू-शशांकचा गुड बाय, लक्ष्मी करणार सगळ्यांना हाय

Last Updated:

तब्बल 3 वर्ष मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि अभिनेता चेतन वडनेरे यांच्या प्रमुख भूमिका मालिकेत आहेत.

ठिपक्यांची रांगोळी
ठिपक्यांची रांगोळी
मुंबई, 26 ऑक्टोबर : टेलिव्हिजनवर सध्या नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे जुन्या मालिका आता प्रेक्षकांना रामराम ठोकताना दिसत आहेत. स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. त्यातील एक मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी. अप्पू आणि शंशाक यांची भन्नाट केमिस्ट्री यात पाहायला मिळाली. एकत्रित कुटुंबाची एक सुंदर गोष्ट मालिकेत दाखवण्यात आली मात्र ही मालिका आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
4 ऑक्टोबर 2021 रोजी ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. तब्बल 3 वर्ष मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि अभिनेता चेतन वडनेरे यांच्या प्रमुख भूमिका मालिकेत आहेत. त्याचप्रमाणे, अभिनेत्री लीना भागवत, सुप्रिया पाठारे, मंगेश कदम, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, अतुल तोडणकर, मुग्धा गोडबोले, राधिका विद्यासागर, रंजन ताम्हाणे अशी कलेल्या कलाकारांची टीम होती. सोबतच नम्रता प्रधान, तन्वी बर्वे,अमृता फडके, शितल कुलकर्णी अशा नवोदित कलाकारांनीही मालिकेत धम्माल उडवून दिली.
advertisement
ठिपक्यांची रांगोळी ही मालिका दररोज रात्री दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता 20 नोव्हेंबर पासून याठिकाणी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सुरू होणार आहे. तर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या जागी लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका रात्री 9.30 वाजता सुरू होणार आहे.
advertisement
advertisement
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून अभिनेत्री इशा केसकर टेलिव्हिजनवर प्रमुख अभिनेत्री म्हणून कमबॅक करतेय. अभिनेता अक्षर कोठारी इशाबरोबर प्रमुख भूमिकेत आहे. ही मालिका बेटीया या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. अभिनेत्री इशा केसकर याआधी माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दिसली होती. तिनं साकारलेली शनाया चांगलीच प्रसिद्ध झाली. त्याआधी तिनं जय मल्हार या मालिकेतून बानूबया म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता नव्या मालिकेत इशा काय कमाल करणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
दिवाळीच्या मुहूर्तावर पूर्ण होणार 'ठिपक्यांची रांगोळी'; अप्पू-शशांकचा गुड बाय, लक्ष्मी करणार सगळ्यांना हाय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement