बैलगाडा स्पर्धेतील बैल उधळला; चिमुकलीसह चार गंभीर जखमी, रत्नागिरीमधील थरारक Video
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
खेड तालुक्यातील हेदली या गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान ही घटना घडली आहे.
रत्नागिरी, चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी : रत्नागिरीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील हेदली या गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीदरम्यान उधळलेला बैल प्रेक्षक गॅलरीत घुसला. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका लहान चिमुरडीचा देखील समावेश आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हेदली या ठिकाणी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बैलगाडा स्पर्धा सुरू असताना तिसऱ्या राऊंडला बैल अचानक उधळून प्रेक्षकांच्या मध्ये शिरला या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेत एका चिमुरडीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
रत्नागिरीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील हेदली या गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान चार जण गंभीर जखमी झाले आहेत. pic.twitter.com/OLCypieJ4J
— News18Lokmat (@News18lokmat) January 21, 2024
दरम्यान बैल प्रेक्षक गॅलरीत शिरल्यामुळे घटनास्थळी एकचा धावपळ उडाली. गोंधळ निर्माण झाला. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना मदत ग्रुपच्या सदस्यांनी तसेच खेड पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे.
view commentsLocation :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
January 21, 2024 2:44 PM IST
मराठी बातम्या/कोकण/
बैलगाडा स्पर्धेतील बैल उधळला; चिमुकलीसह चार गंभीर जखमी, रत्नागिरीमधील थरारक Video


