Diabetes Symptoms : मधुमेह होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 10 लक्षणं, तुम्हाला असा त्रास होत नाही ना? एकदा तपासा

  • Published by:
Last Updated:

Diabetes Tips : मधुमेहाचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे. परंतु मधुमेहाचे निदान होईपर्यंत अनेकदा रुग्णांच्या आरोग्याची बरीच हानी झालेली असते. अनेकदा मधुमेह नियंत्रित करणे कठीण होऊन बसते. मधुमेह झाल्यावर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात आणि ही लक्षणे ओळखून मधुमेहाचे निदान करता येते.

मधुमेहाची 10 सुरुवातीची लक्षणे..
मधुमेहाची 10 सुरुवातीची लक्षणे..
मुंबई : मधुमेह हा एक असा आजार आहे जो एकदा झाला की आयुष्यभर सोबत राहतो. मधुमेह झाल्यावर एकतर स्वादुपिंड इन्सुलिन बनवणे थांबवते किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे थांबवतात. स्वादुपिंड इन्सुलिन बनवणे थांबवते या स्थितीला टाइप-1 मधुमेह म्हणतात, तर पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणे थांबवतात तेव्हा त्या स्थितीला टाइप-2 मधुमेह म्हणतात.
या दोन्ही परिस्थितीत साखर रक्तामध्ये जमा होऊ लागते. यामुळे धमन्या आणि अवयवांचे नुकसान होऊ लागते आणि ते भरून काढणे शक्य नसते. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार कॅनेडियन डॉक्टर शिबोन डेशोअल यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात मधुमेहाची सुरुवातीच्या काळातच ओळख पटवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले आहे. टाइप-2 मधुमेह अधिक सामान्य असून त्याची त्याची सुरुवातीची लक्षणे येथे दिली आहेत.
advertisement
मधुमेहाची 10 सुरुवातीची लक्षणे..
वारंवार लघवीला जावे लागणे : मधुमेहामध्ये व्यक्तीला वारंवार लघवीला जावे लागते. थोड्या-थोड्या वेळाने बाथरूममध्ये जाण्याची गरज भासते. या स्थितीला पॉलीयुरिया असेही म्हणतात.
त्वचेवर गडद डाग : अकॅन्थोसिस निग्रिकन्स नावाची त्वचेची स्थिती उद्भवते. त्वचेवर गडद आणि मखमलीसारखे डाग पडतात. हे डाग मुख्यतः मान, काखेत आणि खाजगी भागांच्या आसपास दिसतात. हे इन्सुलिन प्रतिरोधकतेचे लक्षण आहे.
advertisement
त्वचेवर गाठी तयार होणे : त्वचेवर लहान-लहान गाठी येणे हे मधुमेहाचे एक लक्षण असू शकते. या गाठी बहुधा मान, काख आणि खाजगी भागांवर दिसतात.
वारंवार बॅक्टेरियल इन्फेक्शन : मधुमेह झाल्यावर जिवाणू संसर्गाचा धोका वाढतो. मधुमेहामुळे जीवाणूंची वाढ होते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि यीस्ट इन्फेक्शन तसेच मूत्रमार्गाचे संक्रमण होऊ शकतात.
advertisement
हातावर दिसणारे लक्षण : शरीरातील रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास डायबेटिक स्टिफ हँड सिंड्रोम होऊ शकतो. यात तुम्ही तुमचे दोन्ही हात जोडण्याचा प्रयत्न केल्यास ते एकमेकांना चिकटणार नाहीत असे तुम्हाला जाणवेल.
बोटांवर परिणाम : काहीवेळा लोकांना त्यांची बोटे नीट वाकवण्यात किंवा सरळ करण्यात अडचण येते. याला ट्रिगर फिंगर असे म्हणतात.
advertisement
हात-पाय सुन्न पडणे : मज्जातंतूंचे नुकसान झाल्यामुळे हात आणि पाय सुन्न झाल्यासारखे वाटू शकतात. नसा सुन्न झाल्यामुळे व्यक्तीला व्यवस्थित चालण्यात अडचण येते. यामुळे ताण वाढतो आणि दुखापत होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढते.
शार्कोट फूट : मधुमेहामुळे पायांवर अतिरिक्त परिणाम होतो. यामुळे पायांच्या नसा खराब होऊ शकतात, पायाचा आकार बदलू लागतो आणि बोटे वाकडी होऊ लागतात.
advertisement
डायबेटिक फूट इन्फेक्शन : पाय सुन्न झाल्यामुळे व्यक्तीला सहज दुखापत होऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यामुळे ही जखम लवकर भरत नाही. रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे जीवाणूंची वाढ होते आणि पायात संक्रमण सुरू होते. वेळेवर लक्ष न दिल्यास पाय कापण्याची वेळ येऊ शकते.
गॅस्ट्रोपेरेसिस : मधुमेहाच्या रुग्णांना गॅस्ट्रोपेरेसिस होऊ शकतो. यामुळे पचनक्रिया मंदावते. यानंतर वारंवार अपचन, पोट फुगणे, मळमळ आणि उलट्या होण्याचा त्रास होतो.
advertisement
वरील लक्षणं आढळल्यास जीवनशैलीत करा हे बदल
- आहारात फायबरने भरपूर पदार्थांचा समावेश करा.
- कॉम्प्लेक्स कार्ब्स (उदा. पूर्ण धान्य) आहारात समाविष्ट करा.
- गोड खाणे आणि पिणे कमी करा.
- प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहा.
- नियमित कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे व्यायाम करा.
- लठ्ठपणा हा मधुमेहाचेकारण ठरू शकतो त्यामुळे वजन नियंत्रित करा.
- तुम्ही धूम्रपान करत असाल, तर ते लगेच सोडून द्या.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes Symptoms : मधुमेह होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 10 लक्षणं, तुम्हाला असा त्रास होत नाही ना? एकदा तपासा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement