दिवाळी नाही दूर, इथं मिळेल चकली पाव, एकदा खाऊन तर पाहा VIDEO
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
चकली हा विशेष करून दिवाळीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. पण सँडविचच्या दुकानात चक्क चकली पाव मिळत आहे.
मुंबई, 1 ऑगस्ट : चकली हा विशेष करून दिवाळीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. चकली हा प्रकार सहसा दिवाळीत फराळात खाल्ला जातो. लहान मुलांपासून वयस्कर मंडळी देखील ही चकली चवी चवीने खातात. अशातच मुंबईतील मुलुंडच्या एका दुकानदाराने एक वेगळी शक्कल लढवली आहे. सँडविचच्या दुकानात चक्क चकली पाव सुरू केला आहे. चकली पावचा हा अनोखा फ्युजन आता नेटकऱ्यांबरोबरच मुलुंडकरांचा पसंतीस पडत आहे.
कशी झाली सुरुवात?
मुलुंडच्या स्टेशन जवळील परिसरात असलेल्या श्री काशी फूड सेंटर या सँडविच आणि समोसे विकणाऱ्या दुकानात चकली पाव मिळत आहे. श्री काशी फूड सेंटरचे मालक शिवनारायण विश्वकर्मा गेली दोन महिन्यांपासून हा पदार्थ इथे विकत आहेत. अप्रतिम प्रतिसादामुळे हे चकली पाव आता सामान्य नागरिकांबरोबरच नेटकरांना देखील भुरळ पाडत आहे.
advertisement
तुम्ही कधी खाल्लाय का चिकन वडापाव? एकदा पाहा हा Video
या चकली पावची संकल्पना शिवनारायण विश्वकर्मा यांना त्यांच्या जुन्या ग्राहकाने दिली होती. ग्राहकाच्या लहानपणी हा पदार्थ ते त्यांच्या गावी उत्तर प्रदेश या ठिकाणी खात होते. परंतु कालांतराने हा चकली पाव पदार्थ दिसेनासा झाला. तर त्या ग्राहकाच्या इच्छेचा मान ठेवत शिवनारायण यांनी तो पदार्थ त्यांना बनवून खाऊ घातला. त्याचबरोबर आणखी काही ग्राहकांना चव चाखण्यासाठी दिली आणि त्या ग्राहकांनी त्या चकली पावला पसंती व्यक्त केल्यामुळे तेव्हापासून शिव विश्वकर्मा त्यांच्या दुकानात हा पदार्थ विकत आहेत.
advertisement
कसा तयार होतो चकली पाव?
हा चकली पाव खाण्यास अगदीच खुसखुशीत अशी आहे. पावाला बटर आणि हिरवी चटणी लावून त्यात चीज घातले जाते. त्या चीझ वर चकली ठेवली जाते. त्यावर आणखीन चीज घालून वडापाव सारखा तो चकली पाव बंद केला जातो. त्या बंद चकली पावला बटर लावून त्याला ग्रील मशीनमध्ये ग्रील केले जाते. गरमा-गरम चकली पावला एक्स्ट्रा चकली सोबत प्लेटवर सर्व्ह केले जाते. म्हणून या श्रीकाशी फूड सेंटरमध्ये चकली पाव खाण्यास गर्दी होते. हा चकली पाव फक्त 25 रुपयात या ठिकाणी मिळतो, अशी माहिती श्री काशी फुडचे मालक शिवनारायण विश्वकर्मा यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2023 8:57 AM IST