Panipuri : नाशिकच्या तरुणीनं सुरू केली 'पापा की परी पाणीपुरी', महिन्याला करते बक्कळ कमाई

Last Updated:

Panipuri Business: पाणीपुरी हा पदार्थ कितीही चवदार असला तरी त्यातलं जर पाणी स्वच्छ नसेल, तर तो तब्येत बिघडवणारा ठरू शकतो. शिवाय अनेकजणांना पाणीपुरी पाहिल्यावर स्वत:ला आवरणं कठीण होतं. अशा सर्व खाद्यप्रेमींसाठी...

+
पाणीपुरी

पाणीपुरी व्यवसाय

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी 
नाशिक : पाणीपुरी म्हणजे अनेकजणांसाठी अगदी जीव की प्राण, पाणीपुरी पाहिल्यावर फार कमी लोक असे असतील की, ज्यांना एकही पुरी खाऊ नये असं वाटत असावं. परंतु पाणीपुरी खाण्याची आवड मात्र एका तरुणीच्या अगदी जीवावर बेतता बेतता राहिली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल वर्षभर तिला घरीच आराम करावा लागला, मग पाणीपुरीच काय कोणतेही चमचमीत पदार्थ खाण्याची तिला मनाई करण्यात आली होती. मग काय, ही तरुणी आराम करून ठणठणीत बरी झाली आणि आपल्यासारखा त्रास इतरांना सोसावा लागू नये यासाठी तिनं स्वत: पाणीपुरीचा व्यवसाय करायचं ठरवलं.
advertisement
पाणीपुरी हा पदार्थ कितीही चवदार असला तरी त्यातलं जर पाणी स्वच्छ नसेल, तर तो तब्येत बिघडवणारा ठरू शकतो. शिवाय अनेकजणांना पाणीपुरी पाहिल्यावर स्वत:ला आवरणं कठीण होतं. अशा सर्व खाद्यप्रेमींसाठी नाशिकच्या पृष्णा राहुल या तरुणीनं स्वत: सगळी स्वच्छता बाळगून बनवलेली पाणीपुरी विकायला सुरुवात केली. आज ही पाणीपुरीच तिची ओळख झाली आहे. या पाणीपुरीचं नाव आहे 'पापा की परी पाणीपुरी'. सोशल मीडियावरही तिची चर्चा झाली.
advertisement
2018 साली सतत पाणीपुरी खाल्ल्यानं पृष्णाला पोटाचा आजार झाला. तिला 1 वर्ष पलंगावरच झोपून काढावं लागलं. त्यावेळी तिला काही मोजकेच पदार्थ खाण्याची परवानगी होती. शिवाय आराम मिळाल्यानंतरही बाहेरची पाणीपुरी खाण्याबाबत तिच्या मनात भिती निर्माण झाली होती. म्हणून एकदा तिनं घरीच पाणीपुरी बनवली, त्यावेळी वडिलांनी सहज बोलता बोलता नकळतपणे पाणीपुरी विकण्याची कल्पना तिला दिली. पृष्णाने मात्र ती मनावरच घेतली.
advertisement
पृष्णाने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पाणीपुरीची गाडी सुरू केली आहे. अनेकजण अनलिमिटेड पाणीपुरी खाऊ शकतात. कारण कितीही पुऱ्या खाल्ल्या तरी पोट भरतं पण मन नाही, या विचारातून पृष्णा 70 रुपयांना अनलिमिटेड पाणीपुरीची विक्री करते आणि तिला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. त्यातून पृष्णाला चांगलं उत्पन्नही मिळतं. पृष्णा ही एक शास्त्रीय नर्तिका असून तिनं भरतनाट्यममध्ये मास्टर्स केलंय. तर, तिचे आई-वडील डॉक्टर आहेत.
मराठी बातम्या/Food/
Panipuri : नाशिकच्या तरुणीनं सुरू केली 'पापा की परी पाणीपुरी', महिन्याला करते बक्कळ कमाई
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement