आईस्क्रीम ते लाडू, पुण्यात भरलाय मिलेट्स महोत्सव, एकाच ठिकाणी चाखा वेगवेगळ्या पदार्थांची चव
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
तृणधान्याची बाजारपेठ वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या माध्यमातून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मिलेट्स (तृणधान्य) महोत्सव हा आयोजित करण्यात आला आहे. इथे विविध प्रकारचे मिलेट्स आणि त्यापासून बनवलेले पदार्थ चाखायला मिळतात.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : रोजच्या आहारात पौष्टिक अन्न असणं हे अत्यंत गरजेचं झालं आहे. वाढते आजार पाहता आज लोक मिलेट्सचा समावेश हा आपल्या आहारात करताना पाहिला मिळतात. परंतु तृणधान्याची बाजारपेठ वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या माध्यमातून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मिलेट्स (तृणधान्य) महोत्सव हा आयोजित करण्यात आला आहे. इथे विविध प्रकारचे मिलेट्स आणि त्यापासून बनवलेले पदार्थ चाखायला मिळतात. कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय कदम यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
advertisement
तृणधान्य हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर
2023 ला आंतरराष्ट्रीय तृणधान्य महोत्सव साजरा करण्यात आला. पूर्वी जे मिलेट्स होते ते खाण्यात येत होते. परंतु आता फास्ट फूडमुळे ते लोप पावलं. तृणधान्य हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असं आहे. कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म हा देत आहे. मागच्या वर्षी 40 स्टॉल हे होते परंतु या वर्षी मात्र 50 स्टॉल आहेत. यामध्ये 40 रुपयांपासून पदार्थ हे विक्रीसाठी आहेत. मिलेट्स आईस्क्रीम, श्रीखंड, बिस्कीट, शेवया, लाडू असे विविध प्रकारचे पदार्थ इथे पाहिला मिळतात. हा महोत्सव 12 जानेवारीपर्यंत आहे, असं डॉ. संजय कदम सांगतात.
advertisement
महाबळेश्वर स्पेशल चॉकलेट स्ट्रॉबेरी बाऊल, किंमत 130 रुपयांपासून, मुंबईत इथं चाखा चव8 मिलेट्स हे आहेत. ज्वारी, बाजरी हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु अतिशय गुणकारी असणारी, सामा, वरई, राळे, नाचणी, हे आपल्या दैनंदिन आहारात आले तर डायबिटीस, बीपी आहे दूर ठेवता येईल. कृषी पणन मंडळाची 8 विभागीय कार्यालये आहेत. अमरावती, नागपूर, लातूर, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक या भागातील निवडक लोकांना घेऊन हा महोत्सव केला जातो. हा महोत्सवात जवळपास 10 हजार लोक हे इथे येत असतात.
advertisement
मागच्या वर्षी यामध्ये 200 पेक्षा अधिक शेतकरी, प्रक्रियादार, शेतकरी कंपनी, स्टार्टअप सहभागी झाले होते. गेल्या वर्षी 23 लाख रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी 40 लाख रुपयांच्या उलाढालीचा अंदाज आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय कदम यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 10, 2025 11:08 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
आईस्क्रीम ते लाडू, पुण्यात भरलाय मिलेट्स महोत्सव, एकाच ठिकाणी चाखा वेगवेगळ्या पदार्थांची चव