जमाना महागाईचा पण इथं नव्हं, गडी विकतोय चक्क 15 रुपयांना 2 वडापाव, दिवसाला करतोय बक्कळ कमाई
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
साताऱ्यातील मिलिंद धुमाळ हे वडापावचा व्यवसाय करतात. महागाईच्या जमान्यात 15 रुपयांना 2 वडापाव विकत आहेत.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : वडापाव म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही कारण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात वडापावची मोठी क्रेझ पाहायला मिळते. जसा गाव तसा वडापाव आपल्याला वेगवेगळ्या चवीनुसार, वेगवेगळ्या किमतीनुसार खायला मिळतो. अश्याप्रकारेच साताऱ्यातील पवई नाका परिसरात मिलिंद धुमाळ हे वडापावचा व्यवसाय करत आहेत. त्यांची वडापाव विक्रीची सुरुवात 75 पैशांपासून झाली होती. काही काळ दीड, दोन रुपयाला वडापाव विकणारे मिलिंद धुमाळ सद्यस्थितीत महागाईच्या जमान्यात 15 रुपयांना 2 वडापाव विकत आहेत. त्यांच्या वडापाव स्टॉलवर खवय्यांची मोठी गर्दी असते.
advertisement
फक्त 15 रुपयांना 2 वडापाव
साताऱ्यातील पवई नाका परिसरात मिलिंद धुमाळ 27 वर्ष झालं वडापावचा व्यवसाय करत आहेत. थ्री स्टार वडापाव सेंटर असं त्यांच्या वडापाव स्टॉलचे नाव आहे. या ठिकाणचा वडापाव प्रसिद्ध असल्यामुळे खवय्यांची मोठी गर्दी याठिकाणी पाहिला मिळते. कमी पैशांमध्ये लाखो लोकांची भूक भागवण्याचे काम थ्री स्टार वडापाव सेंटरच्या माध्यमातून मिलिंद धुमाळ करत आहेत. ते फक्त 15 रुपयांना 2 वडापाव याठिकाणी विकतात. त्यांच्या वडापाव सेंटरवर वडापाव व्यतिरिक्त शेजवान पॅटीस, समोसा, मसाला पॅटीस, मिसळ अशा वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळतात.
advertisement
कमी किमतीत वडापाव विकण्याचं कारण काय?
सातारा जिल्ह्यातील विविध भागातून मुलं-मुली साताऱ्यातील कॉलेजेस आणि शाळामध्ये येत असतात. काही मुलं पहाटे सहा वाजता घर सोडतात आणि कॉलेजला येतात. खूप मुलं-मुली नाश्ता करत नाहीत ना जेवण, शिक्षणाच्या धडपडीमुळे घरातून लवकर येतात. त्यांच्या खिशात इतके जास्त पैसे नसतात की ते मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकतील.
advertisement
मिमिक्रीच्या माध्यमातून चहावाला करतो ग्राहकांचे मनोरंजन, इथली चहा पिली की मूड होतो एकदम फ्रेश
view commentsत्याचं उद्दिष्टाने गेले 27 वर्ष विद्यार्थ्यां बरोबरच सर्वसामान्य नागरिकांना कमी पैश्यात वडापाव खाऊ घालत आहे. यामधून मला दिवसाला 9 हजार रुपये कमाई होते, असं थ्री स्टार वडापाव सेंटरचे मालक मिलिंद धुमाळे यांनी सांगितले आहे.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
June 06, 2024 11:29 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
जमाना महागाईचा पण इथं नव्हं, गडी विकतोय चक्क 15 रुपयांना 2 वडापाव, दिवसाला करतोय बक्कळ कमाई

