Happy Diwali Wishes : एका क्लिकवर दिवाळीच्या मराठीत हटके शुभेच्छा! इथं तिथं शोधण्यात वेळ घालवू नका
- Published by:Priya Lad
Last Updated:
आपला दिवाळी शुभेच्छा मेसेज सगळ्यात वेगळा असावा, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे इंटरनेटवर बरंच सर्च करून आपण मेसेज शोधून काढतो. त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी निवडक असे दिवाळीचे शुभेच्छा मेसेज एकाच ठिकाणी देत आहोत.
नवी दिल्ली : आज नरकचतुर्दशी. दिवाळीची पहिली अंघोळ. उटणं लावून अभ्यंगस्नान केलं जातं. त्यानंतर एकमेकांना फराळ, मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. सगळ्यांनाच प्रत्यक्षात भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देता देत नाहीत. त्यामुळे मेसेज किंवा व्हॉट्सअॅप स्टेसच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो.
आपला शुभेच्छा मेसेज सगळ्यात वेगळा असावा, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे इंटरनेटवर बरंच सर्च करून आपण मेसेज शोधून काढतो. त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी निवडक असे दिवाळीचे शुभेच्छा मेसेज एकाच ठिकाणी देत आहोत. तुम्हाला मराठीत शुभेच्छा द्यायच्या असतील तर इथं तुम्हाला एकापेक्षा एक मेसेज मिळतील.
advertisement
रांगोळीच्या रंगीत रंगात तुमच्या जीवनाला उजाळा मिळो,
सुख आणि समृद्धीची जोपासना कायमची राहो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
---------------------------------------------
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा...
या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो...
दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा!
---------------------------------------------
advertisement
सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली...
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा!
---------------------------------------------
चला आज पुन्हा एकदा दीप लावूया,
रूसलेल्यांना मनवूया,
डोळ्यातील उदासी दूर करून, जखमांवर फुंकर घालूया.
चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.
हॅपी दिवाळी!
---------------------------------------------
advertisement
लक्ष दिवे तुमच्या जीवनाला प्रकाशमान करू दे,
या दिवाळीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो!
दिवाळीच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा!
स्नेहाचा सुंगध दरवळला दिवाळी आनंदाचा सण आला एकच मागणे देवाला सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
---------------------------------------------
घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास
मनाचा वाढवी उल्हास दिवाळी
advertisement
अशी खास शुभ दिपावली!
---------------------------------------------
समृद्धी आली सोनपावली उधळण झाली
सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला
वर्षा झाली हर्षाची
इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे फुलो दिवाळी तुमची
हीच इच्छा मनी ठेवून सुरूवात करूया दीपावलीची
हॅपी दिवाळी 2024
---------------------------------------------
advertisement
यशाची रोषणाई,
कीर्तीचे अभ्यंग स्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन,
समृद्धीचे फराळ,
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
---------------------------------------------
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
ही दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.
Happy Diwali 2024
advertisement
---------------------------------------------
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट...
दिव्यांची आरास, फराळाचे ताट...
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट...
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट...
शुभ दीपावली...!
---------------------------------------------
दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी,
लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका...
आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
---------------------------------------------
आनंद होवो overflow,
मजा कधी होऊ नये Low,
संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो,
असा तुमचा दिवाळी सण असो!
दिवाळी शुभेच्छा 2024
Location :
Maharashtra
First Published :
October 31, 2024 10:18 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Diwali Wishes : एका क्लिकवर दिवाळीच्या मराठीत हटके शुभेच्छा! इथं तिथं शोधण्यात वेळ घालवू नका