Diabetes Friendly Diwali - दिवाळीत मधुमेहींसाठीही खास पदार्थ, दिवाळीचा आनंद करा साजरा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दिवाळीचा आनंद मधुमेहींना घेता यावा यासाठी हे काही खास पर्याय...फराळासोबत हे पदार्थ बनवा आणि दिवाळीचा आनंद घ्या.
मुंबई - दिवाळी म्हटलं की आनंद, दिव्यांची रोषणाई, आणि खमंग पदार्थांची रेलचेल..आणि सोबतीला गोडधोड पदार्थ...पण गोड म्हटलं की मधुमेहींना हात आखडता घ्यावा लागतो. कारण रक्तातली साखर वाढणं
हे मधुमेहींसाठी धोकादायक असतं. म्हणूनच ही माहिती खास मधुमेहींसाठी काही पदार्थ
कोणताही सण मिठाईशिवाय अपूर्ण असतो. यामुळेच सणासुदीला गोड पदार्थ नक्कीच तयार केले जातात. इथे दिलेल्या पदार्थांमुळे, मधुमेही रुग्णही गोड खाऊ शकतील आणि त्यांची रक्तातील साखरही नियंत्रणात राहील.
ड्रायफ्रूट लाडू - सुक्या मेव्याचे लाडू
मधुमेही रुग्ण सुक्या मेव्याचे लाडू खाऊ शकतात. ड्रायफ्रुट्स बारीक करुन घ्या, लाडू बांधण्यासाठी खजूर आणि किसमिस बारीक करुन घ्या. तुम्हाला हवा तो सुका मेवा काढून घ्या. यामध्ये मुख्यत: बदाम, काजू, अक्रोडचा वापर केला जातो. त्यामुळे हे लाडू पौष्टीक आणि चवदार असतात.
advertisement
चिया सीड्स पुडिंग -
तुम्ही चिया सीड्स पुडिंग बनवू शकता. यासाठी बदामाच्या दुधात चिया सीडस् भिजवा. यात स्टीव्हिया किंवा मोंक फ्रूटसारख्या नैसर्गिक स्वीटनरचा वापर करु शकता. याशिवाय चवीसाठी त्यात ड्रायफ्रूट्स टाकू शकता.
advertisement
नारळाच्या पीठाचे पॅनकेक्स -
हे पॅनकेक नारळाचं पीठ, अंडी आणि बदामाच्या दुधापासून बनवले जातात आणि गोडपणासाठी त्यात शुगर फ्री
सिरप टाकलं जातं. याशिवाय त्यावर ताजी फळं टाकू शकता. यासाठी लागणाऱ्या नारळाचं पीठ तयार करण्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2024 8:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes Friendly Diwali - दिवाळीत मधुमेहींसाठीही खास पदार्थ, दिवाळीचा आनंद करा साजरा


