वजन वाढवायचं तरी कसं? काळजी नाही डायट नोट करा; आठवड्यात दिसू शकतो फरक
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
वाढलेलं वजन कमी करणं जेवढं कठीण आहे, तेवढंच वजन वाढवणंही अवघड आहे. परंतु रोजच्या सवयींमध्ये काही बदल करून आपण निश्चितच वजन वाढवू शकता.
रामकुमार नायक, प्रतिनिधी
रायपूर : आजकाल वजन कमी करण्यासाठी जेवढ्या मोठ्या संख्येनं लोक प्रयत्न करत असतात, तेवढेच लोक वजन वाढतच नाही या चिंतेत दिसतात. काहीजणांचं वजन जरा काही खाल्लं की लगेच वाढतं, काहीजणांचं वजन मात्र कितीही खाल्लं तरी किंचितही जागचं हलत नाही. अशावेळी नेमकं करावं काय हा मोठा प्रश्नच त्यांना पडतो. शिवाय लोक त्यांना सतत कसलं टेन्शन आहे का, आजारी आहेस का, असे प्रश्न विचारून अगदी भांडावून सोडतात. आज आपण यावर तोडगा काढूयाच!
advertisement
डायटिशियन डॉ. सारिका श्रीवास्तव सांगतात की, वाढलेलं वजन कमी करणं जेवढं कठीण आहे, तेवढंच वजन वाढवणंही अवघड आहे. परंतु रोजच्या सवयींमध्ये काही बदल करून आपण निश्चितच वजन वाढवू शकता. त्यासाठी कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्सची प्रचंड आवश्यकता असते. एका आठवड्यात आपलं 1 किलो वजन सहज वाढू शकतं.
advertisement
आपण डायटमध्ये काजू, बदाम, मनुक्यांचा समावेश करावा. ड्रायफ्रूट्स भिजवून खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत मिळते. केळ्याचा शेकही वजनवाढीसाठी फायदेशीर ठरतो. नाहीतर फक्त दुधात केळं आणि तूप घालून दररोज प्यायल्यानंही वजन वाढतं. वजनवाढीसाठी डायटमध्ये भरपूर प्रोटिन्स असायला हवे. त्यासाठी दूध, दही भरपूर खावं. आपल्याला थायरॉईडचा त्रास नसेल, तर आपण सोयाबीन खाऊ शकतात. त्यात प्रोटिन्स असतात. मांसाहार करत असाल, तर अंडी, चिकन, मासे खाण्यावर जास्त भर द्या. याव्यतिरिक्त पीनट बटर आणि चीज खाऊनही वजन वाढू शकतं.
advertisement
दिवसभरात किमान 3 वेळा अन्न पोटात जायलाच हवं. ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर अजिबात स्किप करायचं नाही. शिवाय इव्हिनिंग स्नॅक्सही आवर्जून खावे. शेंगदाणे, साबुदाणे, खीर हे वजन वाढवणारे पदार्थ आहे. परंतु भरपूर खायचं म्हणजे अनहेल्थी पदार्थ खायचे असं नाही. फास्टफूड, जंकफूडपासून दूर राहावं. तरच हेल्थी वजनवाढ होऊ शकते. शिवाय पाणी भरपूर प्यावं आणि निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करावा.
Location :
Raipur,Chhattisgarh
First Published :
August 12, 2024 3:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
वजन वाढवायचं तरी कसं? काळजी नाही डायट नोट करा; आठवड्यात दिसू शकतो फरक