चिरतरुण ठेवेल हा आरोग्याचा मंत्र, काय आहे 86 वर्षीय आजोबांच्या फिटनेसचं रहस्य?

Last Updated:

इच्छाशक्ती असेल तर वृद्धापकाळातही आनंदी आणि निरोगी जीवन जगता येते. हेच वर्ध्यातील 86 वर्षीय आजोबांनी दाखवून दिलंय.

+
चिरतरुण

चिरतरुण ठेवेल हा आरोग्याचा मंत्र, काय आहे 86 वर्षीय आजोबांच्या फिटनेसचं रहस्य?

वर्धा, 30 सप्टेंबर: इच्छाशक्ती असेल आणि आळस नसेल तर कोणत्याही वयात तणावरहित निरोगी जीवन जगता येणे शक्य आहे. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे वर्ध्यातील मनोहरराव दादाजी वानखेडे होय. या आजोबांचं वय तब्बल 86 वर्ष आहे. तरी याही वयात त्यांची ऊर्जा आणि फिटनेस तरुणांना आश्चर्यात पाडणारा आहे.
वानखेडे आजोबा वर्ष 1956 पासून शिक्षक म्हणून कर्तव्यावर होते. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 1996 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. पहिली ते सातवी पर्यंत मराठीसह इतरही विषय त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले आहेत. 37 वर्ष त्यांनी शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली. त्यानंतरही आजोबांनी आपला फिटनेस कायम राखला असून 86 व्या वर्षीही त्यांचं आरोग्य उत्तम आहे.
advertisement
आजोबांना फिटनेसची आवड
वानखेडे आजोबा पूर्वीपासूनच आरोग्याची योग्य ती काळजी घेतात. त्यासाठी सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाणे, व्यायाम करणे, प्राणायाम करणे, वृत्तपत्र वाचणे तसेच स्वतःचे काम स्वतः करणे ही सवय त्यांच्या नित्याची आहे. आजोबा एकही दिवस मॉर्निंग वॉक चुकवत नाहीत. त्यांनी निरोगी राहण्यासाठी सुरवातीपासून काळजी घेतली असून फिटनेस संदर्भातील नित्याच्या गोष्टी ते टाळत नाहीत.
advertisement
रोज 5-6 किलोमीटर वॉकिंग
योग्य शिक्षणासोबतच शरीर तंदुरुस्त असणे आजच्या काळात किती महत्त्वाचं आहे, याची कल्पना आजोबांना लहानपणापासूनच होती. त्यामुळे सकाळी लवकर कुठून नियमित मॉर्निंग वॉक आणि व्यायामाची सवय त्यांना आहे.. नऊ जणांच्या एकत्र कुटुंबसोबत ते वर्धा शहरात राहतात. आजोबा दररोज अंदाजे पाच ते सहा किलोमीटर चालतात रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्याची सवय आहे. कदाचित त्यामुळेच याही वयात त्यांना कोणताही आजार नाही. इतकंच नाही तर आज पर्यंत एकही औषध त्यांना घ्यावं लागलं नाही, असं ते सांगतात.
advertisement
आजोबांपासून प्रेरणा घेण्याची गरज
माणसाने अंगात आळस बाळगू नये, नियमित व्यायाम करावा, सकाळी मॉर्निंग वॉकला जावे आणि सकस शुद्ध आहार घेण्याचा सल्ला ते आजच्या तरुणाईला देतात. खरंच दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्त्व आहे. त्याची काळजी लहानांसह मोठ्यांनीही घेतलीच पाहिजे. आरोग्य बिघडल्यावर सुधारत बसण्यापेक्षा आरोग्य बिघडून नये म्हणून काळजी घेणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. त्यामुळे निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्यातला आळस दूर करून आजोबांकडून प्रेरणा घ्यायला हवी.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
चिरतरुण ठेवेल हा आरोग्याचा मंत्र, काय आहे 86 वर्षीय आजोबांच्या फिटनेसचं रहस्य?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement