Hotwifing म्हणजे नक्की काय? खरंच 'या' ट्रेंडमुळे नवरा-बायकोच्या Private आयुष्यात वाढते एक्साइटमेंट, एक्सपर्ट काय सांगतात?

Last Updated:

हा ट्रेंड खासकरून नॉन-मोनोगॅमस रिलेशनशिप्स मध्ये दिसून येतो. म्हणजेच, असे कपल्स जे एकमेकांप्रती समर्पित असले तरी इतरांशीही शारीरिक किंवा रोमँटिक संबंध ठेवण्यास मोकळे असतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या आधुनिक आणि खुल्या समाजात, नातेसंबंधांना लक्षात घेऊन अनेक नवीन ट्रेंड्स समोर येत आहेत. सोशल मीडिया आणि ओपन रिलेशनशिप्सच्या जगात एक नवा ट्रेंड चर्चेत आला आहे. हॉटवाइफिंग (Hotwifing). हा ट्रेंड खासकरून नॉन-मोनोगॅमस रिलेशनशिप्स मध्ये दिसून येतो. म्हणजेच, असे कपल्स जे एकमेकांप्रती समर्पित असले तरी इतरांशीही शारीरिक किंवा रोमँटिक संबंध ठेवण्यास मोकळे असतात.
काय आहे 'हॉटवाइफिंग'?
'हॉटवाइफिंग' ही एक सहमतीने मान्य केलेली नॉन-मोनोगॅमी पद्धत आहे, ज्यामध्ये विवाहित किंवा कमिटेड स्त्री (जिला हॉटवाइफ म्हणतात) इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवते. विशेष म्हणजे, तिच्या जोडीदाराला या नात्याची पूर्ण माहिती असते आणि तो याला पाठिंबाही देतो. काही वेळा तो यामध्ये प्रत्यक्ष सहभागही घेतो.
मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात?
कोलकातास्थित मानसोपचारतज्ज्ञ मानसी पोद्दार यांचे म्हणणे आहे की, "हॉटवाइफिंगमध्ये जोडीदार आपल्या पार्टनरच्या इतरांसोबतच्या संबंधांमधून आनंद घेतो — तो ते पाहून, ऐकून किंवा सहभागी होऊन तसा अनुभव घेतो. मात्र, हे सगळं फक्त परस्पर विश्वास आणि स्पष्ट सहमतीवर चालतं."
advertisement
NIMS मेडिकल कॉलेजच्या सायकोलॉजिस्ट डॉ. नीतू तिवारी यांच्या मते, हॉटवाइफिंगमुळे नात्यांमध्ये उत्सुकता, ट्रस्ट आणि नवलाईचा अनुभव वाढतो.
का होतंय हे ट्रेंडिंग?
रेडिट आणि टिकटॉकवर अनेक कपल्स हॉटवाइफिंगबद्दल आपले अनुभव शेअर करत आहेत. काहींनी हे अनुभव सकारात्मक आणि इमोशनल ग्रोथ करणारे म्हटले, तर काहींनी जळफळाट, गोंधळ आणि अपराधगंड निर्माण करणारे.
सेक्स थेरपिस्ट प्रियंका कपूर सांगतात की, "कधी कधी जोडीदार फारच आकर्षक वाटतो म्हणून काही जण त्याला 'एक्सक्लुझिव्ह' ठेवणं शक्य नाही असं मानतात. तर काही पुरुष इरेक्टाइल डिस्फंक्शन किंवा वैयक्तिक लैंगिक कंटाळा यामुळे हॉटवाइफिंगकडे वळतात."
advertisement
अंतिम विचार
हॉटवाइफिंग ही एक वैयक्तिक निवड आहे. सर्वसामान्य विवाहसंस्थेपासून थोडी वेगळी असली तरी, परस्पर सहमती आणि स्पष्ट संवाद या ट्रेंडचं मूलतत्त्व आहे. आधुनिक, नॉन-मोनोगॅमस कपल्समध्ये याचा स्वीकार वाढतो आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hotwifing म्हणजे नक्की काय? खरंच 'या' ट्रेंडमुळे नवरा-बायकोच्या Private आयुष्यात वाढते एक्साइटमेंट, एक्सपर्ट काय सांगतात?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement