रात्रीचा भात उरलाय? मग शिळ्या भाताची करा मऊ इडली, जाणून घ्या सोपी रेसिपी
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
शिळ्या भातापासून तुम्ही मऊ लुसलुशीत इडली देखील बनवू शकता. तेव्हा शिळ्या भातापासून बनणाऱ्या इडलीची रेसिपी जाणून घ्या.
अनेकदा घरी रात्रीचा भात शिल्लक राहतो. अशावेळी या शिळ्या भाताचे काय करायचे असा प्रश्न गृहिणींना पडतो. तेव्हा या शिळ्या भातापासून तुम्ही मऊ लुसलुशीत इडली देखील बनवू शकता. तेव्हा शिळ्या भातापासून बनणाऱ्या इडलीची रेसिपी जाणून घ्या.
इडली बनवण्यासाठी साहित्य :
दीड कप शिळा भात
एक कप रवा
एक कप दही
अर्धा चमचा बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
इडली बनवण्याची कृती :
शिळ्या भातापासून इडली बनविण्यासाठी सर्वात पहिले ब्लेंडरमधून दीड कप भात आणि एक कप पाणी मिक्स करून त्याचे स्मूथ बॅटर तयार करून घ्या. तयार बॅटर एका भांड्यात काढून वेगळे ठेवा. मग भाजलेल्या रव्यात दही आणि मीठ मिक्स करा तसेच शिळ्या भाताचे तयार केलेले बॅटर देखील यात मिक्स करा. मग हे मिश्रण 3 ते 4 मिनिटे फेटून घ्या आणि अगदी हलके होऊ द्या. मग एका दुसऱ्या भांड्यात काढून 20 मिनिटे असेच ठेवा आणि पीठ थोडे फुलू द्या. आवश्यकेनुसार पाणी घालून पुन्हा फेटा आणि मग बेकिंग पावडर मिक्स करा. आता इडली बनवण्यासाठी इडली पात्रामध्ये थोडं तेल लावा आणि तयार बॅटर त्यात घालून साधारणतः मध्य आचेवर 15 मिनिट्स वाफवा. अशा तऱ्हेने इडली तयार होतात मग ही इडली चटणी किंवा सांबर सोबत खा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2023 8:00 AM IST