Nipple Fruit: ‘या’ आगळ्यावेगळ्या फळाविषयी माहिती आहे का? ‘या’ विदेशी फळाचे आहेत ‘इतके’ फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Nipple Fruit : सोलॅमन मॅमोसम हे फळ दिसायला एकदम विचित्र किंवा आगळं वेगळं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एका बाजूला हे फळ गाईच्या आचळासारखं तर दुसऱ्या बाजूला मानवी स्तनाग्रासारखं दिसतं. या फळाचा रंग पिवळसर असतो तर याच्या बिया या लाल किंवा तपकिरी रंगाच्या असतात.
मुंबई: 'सोलॅनम मॅमोसम' या विदेशी फळाला निप्पल फ्रूट या नावेही ओळखलं जातं. या फळाचं मूळ दक्षिण अमेरिकेतलं आहे. फळाच्या आगळ्या वेगळया आकारामुळे त्याला निप्पल फ्रूट किंवा फॉक्स हेड असं संबोधतात. सोडामचं सफरचंद अशीही या फळाची ओळख आहे. शास्त्रीयदृष्ट्या पहायला गेलं तर हे फळ सोलानेसी कुटुंबातलं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या रोजच्या वापरातली वांगी, टोमॅटो आणि बटाटे हे सुद्धा याच परिवाराचे सदस्य आहेत. जाणून घेऊयात ‘या’ आगळ्यावेगळ्या फळाविषयी
नेमकं हे फळ असतं तरी कसं?
सोलॅमन मॅमोसम हे फळ दिसायला एकदम विचित्र किंवा आगळं वेगळं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एका बाजूला हे फळ गाईच्या आचळासारखं तर दुसऱ्या बाजूला मानवी स्तनाग्रासारखं दिसतं. या फळाचा रंग पिवळसर असतो तर याच्या बिया या लाल किंवा तपकिरी रंगाच्या असतात. या फळाचं मूळ हे दक्षिण अमेरिकेतलं जरी असलं तरीही दक्षिण मेक्सिको, मध्य अमेरिका आणि कॅरिबियनसारख्या अनेक प्रदेशांमध्ये सुद्धा हे फळ आढळून येतं. या फळाची पानं पातळ आणि साधी असतात, जी खोडाच्या बाजूने उगवलेली असतात.
advertisement
विविध संस्कृतींमध्ये महत्त्व
चीन आणि जपानमध्ये या फळाला आगळं वेगळं सांस्कृतिक महत्त्व आहे. या फळाच्या वापर सजावटीच्या केला जातो. चीनमध्ये नववर्षाच्या वेळी धार्मिक उत्सवांमध्ये या फळाचा वापर केला जातो. या फळाला खालच्या बाजूला असलेली स्तनाग्रे किंवा 5 बोटं यांना दीर्घायुष्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. चीनमध्ये या फळाला 5 फिंगर एग प्लँट आणि जपानमध्ये या फळाला 'फॉक्स फेस' म्हणतात.
advertisement
ऐकावं ते नवलंच
सर्वसामान्यपणे कोणतंही फळ जेव्हा पिकतं तेव्हा ते खाणं फायद्याचं ठरतं.मात्र निप्पल फ्रूट हे पिकल्यावर ते विषारी बनतं. त्यामुळे ते खाणं जीवघेणं ठरू शकतं. मात्र हे फळ कच्चं असताना ते जर उकळवून थंड करून खाल्लं तर ते आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. फिलिपिन्ससारख्या काही देशांमध्ये, कच्ची फळं उकळून ती खाल्ली जातात. फळ शिजवल्यावर तो कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि जीवनसत्व ब यांचा चांगला स्रोत बनतो. या फळाच्या पानांचा वापर सौम्य नार्कोटीक चहा करण्यासाठी केला जातो.
advertisement
नैसर्गिक कीटकनाशक
आधी सांगितल्या प्रमाणे फळ पिकल्यावर विषारी बनतं त्यामुळे फळाच्या या विषारीपणाचा वापर नैसर्गिक कीटक नाशक म्हणून केला जातो. या फळात असलेल्या स्टिरॉइडल ग्लायकोअल्कॅलोइडमुळे झुरळं मरतात, त्यामुळे झुरळं मारण्याच्या औषधात याचा वापर दिसून येतो. शिवाय या फळाच्या रसाचा वापर डिटर्जंट म्हणूनही करता येतो. खाल्ले जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2024 1:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Nipple Fruit: ‘या’ आगळ्यावेगळ्या फळाविषयी माहिती आहे का? ‘या’ विदेशी फळाचे आहेत ‘इतके’ फायदे