Tulsi Vivah Rangoli : बॉटलच्या सहाय्यानं तुळशी विवाहसाठी काढा झटपट रांगोळी, 'ही' सोपी ट्रिक पाहून तुम्हीही व्हाल थक्क
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
तुळशी विवाहच्या निमित्ताने दाराजवळ सुंदर रांगोळी काढण्यासाठी प्लास्टिक बॉटलची एक ट्रिक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचा वापर करून तुम्ही रेखीव रांगोळी काढू शकता.
दिवाळीनंतर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो. तेव्हा यानिमित्ताने दाराजवळ छान रांगोळी काढली जाते. तुळशी विवाहच्या निमित्ताने दाराजवळ सुंदर रांगोळी काढण्यासाठी प्लास्टिक बॉटलची एक ट्रिक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचा वापर करून तुम्ही रेखीव रांगोळी काढू शकता.
पंचांगानुसार द्वादशी तिथी गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:06 वाजता संपेल. उदयतिथीचा विचार करून तुळशीविवाह 24 नोव्हेंबरलाच साजरा केला जाणार आहे. तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने एक सोपी ट्रिक वापरून तुम्ही दाराजवळ सुंदर रांगोळी काढू शकता. यासाठी तुम्हाला एक प्लास्टिक बॉटल आणि रांगोळीच्या रंगांची आवश्यकता असेल.
advertisement

व्हिडीओमध्ये दिल्यानुसार तुम्ही आधी जमिनीवर तुमचा आवडता रंग टाकून घ्या. मग यावर एक प्लास्टिकची बॉटल ठेऊन पांढऱ्या रांगोळीने बॉटलचा आकार काढून घ्या. बॉटलचा आकार काढून झाला की मग त्याला स्त्रीच्या साडी प्रमाणे आकार द्या आणि त्यात रंग भरा. तसेच रांगोळीच्या वरच्या बाजूला तुळशीची पाने आणि फांद्या काढा. अशाप्रकारे सोपी ट्रिक वापरून तुमची तुळशी विवाह निमित्त स्पेशल रांगोळी झटपट तयार होईल.
advertisement

तुळशी विवाहाचे महत्त्व :
हिंदू तुळशी विवाहाला धार्मिक महत्त्व आहे. तुळशीमातेसोबत भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा या दिवशी विवाह आयोजित केला जातो. विधीनुसार या दिवशी तुळशी-शालीग्राम विवाह आयोजित केल्याने जीवनात सकारात्मकता येते असे म्हंटले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2023 9:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tulsi Vivah Rangoli : बॉटलच्या सहाय्यानं तुळशी विवाहसाठी काढा झटपट रांगोळी, 'ही' सोपी ट्रिक पाहून तुम्हीही व्हाल थक्क