हिवाळ्यात चेहऱ्यावर ग्लो कायम ठेवायचा? कोणते फेशिअल योग्य, पाहा VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
आता काही दिवसांतच लग्न समारंभाला सुरवात होईल. पण, हिवाळा असल्याने चेहरा सुकलेला दिसतो. चेहऱ्यावरील ग्लो कायम ठेवण्यासाठी हिवाळ्यात कोणते फेशिअल करावे? याबाबत जाणून घेऊ.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : नुकतेच तुळशीचे लग्न पार पडले आणि आता लग्न समारंभाला सुरुवात होईल. हिवाळा असल्याने आता कोणत्याही समारंभात चेहऱ्यावर ग्लो कसा कायम ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. फेशियल केल्यास काही वेळा चेहरा लाल होतो. मग या सर्व समस्येतून वाचण्यासाठी काय करावे? कोणते फेशिअल योग्य आहेत? याबद्दलच त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
हिवाळ्यात कोणते फेशिअल करावे?
याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याशी लोकल 18 ने चर्चा केली तेव्हा त्या सांगतात की, आपल्या त्वचेचे तीन प्रकार असतात. त्या प्रकारानुसार आपल्याला फेशिअल निवडावे लागते. पण, सर्वात महत्वाचं म्हणजे त्वचेचा प्रकार कोणताही असो, हिवाळ्यात स्क्रब टाळणे आवश्यक आहे. कारण, हिवाळ्यात त्वचा आधीच कोरडी होते. त्यात जर स्क्रब केले तर त्वचेला हानी पोहचते आणि चेहरा लाल होतो. त्यावरून पुन्हा मग वेगवेगळे प्रॉब्लेम निर्माण होतात.
advertisement
त्यानंतर हिवाळ्यात ग्लिसरीन असलेले फेशिअल प्रॉडक्ट देखील वापरू नये. कारण, ग्लिसरीन मुळे चेहरा काळा पडतो. आणखी तेलकट होतो. अनेकांचा गैरसमज असतो की, ग्लिसरीनमुळे त्वचा नरम राहते, ग्लो करते त्यामुळे वारंवार ग्लिसरीन वापरतात. त्यामुळे त्वचा आणखी तेलकट होते आणि समस्या वाढतात.
advertisement
त्यानंतर ज्या फेशिअल प्रॉडक्टने त्वचा कोरडी पडते ते प्रॉडक्ट वापरू नये. हिवाळ्यात आधीच आपली त्वचा कोरडी झालेली असते आणि हे प्रॉडक्ट वापरल्यास आणखी कोरडे होऊन त्वचेला हानी पोहचते. चुकीने जर वापरण्यात आले तर त्यावर लगेच मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे.
advertisement
हिवाळ्यात फेशिअल करतांना स्क्रब आणि ग्लिसरीनयुक्त प्रॉडक्ट जर टाळले तर इतर कोणतेही फेशिअल तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही करू शकता. त्याचबरोबर त्वचा कोरडी होणार नाही याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला देखील तेवढाच महत्वाचा असतो.
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
November 16, 2024 5:40 PM IST

