Tea Estate Destinations : चहाच्या मळ्यांत रोमँटिक सुट्टी अनुभवायचीय? 'या' 5 टी इस्टेटला नक्की भेट द्या..

  • Published by:
Last Updated:

Best Tea Estate Destinations in India : तुम्ही रोमँटिक सुट्टीचे नियोजन करत असाल किंवा वर्षाची फ्रेश सुरुवात शोधत असाल, तर ही ठिकाणे तुम्हाला अविस्मरणीय सुट्टीची हमी देतात.

टी इस्टेट गेटवेज
टी इस्टेट गेटवेज
मुंबई : जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने भारताच्या निसर्गरम्य चहाच्या मळ्यांना भेट देण्यासाठी उत्तम आहेत. हिरव्यागार डोंगररांगा आणि चहाच्या मळ्यांनी वेढलेले, हे खास निवडलेले रिसॉर्ट्स चहा चाखण्याच्या सत्रांपासून ते मळ्यांच्या गाईडेड टूर्सपर्यंतचे अनोखे अनुभव देतात. तुम्ही रोमँटिक सुट्टीचे नियोजन करत असाल किंवा वर्षाची फ्रेश सुरुवात शोधत असाल, तर ही ठिकाणे तुम्हाला अविस्मरणीय सुट्टीची हमी देतात.
द पोस्टकार्ड, दुर्रांग टी इस्टेट - आसाम..
आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये वसलेले एक लक्झरी बुटीक हॉटेल 'द पोस्टकार्ड' (The Postcard, Durrung Tea Estate) मध्ये तुमचा मुक्काम खरोखरच अविस्मरणीय बनेल. द पोस्टकार्ड हॉटेलच्या पोर्टफोलिओमधील ही नवीन प्रॉपर्टी 1400 एकरच्या चहाच्या मळ्यांमध्ये पसरलेली आहे. इथे तुम्हाला सर्वोत्तम चहा, प्रादेशिक खाद्यपदार्थ आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची संधी मिळते. आसामच्या परंपरा, लोक आणि विहंगम दृश्यांचे प्रतिबिंब दर्शवण्यासाठी डिझाइन केलेले हे ठिकाण निसर्गाशी जोडले जाण्यासाठी, जगातील सर्वोत्तम चहा अनुभवण्यासाठी आणि स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खास आहे.
advertisement
येथील वैशिष्ठ्य : येथे तुम्हाला खास गाईडेड टूर्समधून आसामचा समृद्ध चहा बनवण्याचा वारसा अनुभवता येतो आणि निसर्गाच्या सुंदर वातावरणात ताज्या असामी नाश्त्याचा आस्वाद घेता येतो.
ग्लेनबर्न टी इस्टेट - दार्जिलिंग, पश्चिम बंगाल..
चाहप्रेमींसाठी ग्लेनबर्न टी इस्टेट (Glenburn Tea Estate) हे एक स्वप्नाळू ठिकाण आहे. चहा हे इथले वैशिष्ट्य असले तरी, येथील विहंगम दृश्ये, स्पा ट्रीटमेंट्स आणि आऊटडोअर ऍक्टिव्हिटीज तुमचा अनुभव आणखी वाढवतात. चहा लागवडीपासून ते प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी इस्टेटमधून फिरा. त्यानंतर गाईडेड फॅक्टरी टूर आणि चहा चाखण्याच्या सत्रातून चहाच्या विविध प्रकारांची माहिती मिळवा. ट्रेकिंगची आवड असलेल्यांसाठी, रमणिटे दारा व्ह्यूपॉईंट किंवा सिक्किममधील मंजीतार सस्पेन्शन फूटब्रिजवर ट्रेकिंगचा अनुभव घ्या. पर्यटक इथे मासेमारी करू शकतात, दार्जिलिंग किंवा कालिंपोंगला डे ट्रिप करू शकतात किंवा ग्लेनबर्न लॉज आणि कॅम्पसाइटवर बार्बेक्यू आणि बोनफायरचा आनंद घेऊ शकता.
advertisement
येथील वैशिष्ठ्य : इस्टेटच्या खास 'चहा अनुभवा' च्या टूरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चहाचा खास ब्लेंड बनवू शकता, जो चाहप्रेमींसाठी एक खास आठवण ठरू शकतो.
तलय्यार व्हॅली बंगलो - मुन्नार, केरळ..
मुन्नार शहरापासून सुमारे 18 किमी अंतरावर, तलय्यार व्हॅली बंगलोकडे (Talayar Valley Bungalow) जाणारा रस्ता सुंदर चहाच्या मळ्यांमधून आणि वाहणाऱ्या ओढ्यांच्या मधून जातो. हा आकर्षक ब्रिटिशकालीन बंगला वुडब्रियर ग्रुपद्वारे व्यवस्थापित केलेल्या 2,500 एकरच्या चहाच्या मळ्यांच्यामध्ये वसलेला आहे. इथे चार सुंदर सूट्स आहेत, ज्यापैकी काही सूट्समध्ये शेकोट्या आणि काहीमध्ये चार-पोस्टर बेड आहेत. दुर्मिळ नीलगिरी ताहेरसाठी प्रसिद्ध असलेल्या एराविकुलम राष्ट्रीय उद्यानाजवळ असल्यामुळे, हे ठिकाण आराम आणि नैसर्गिक सौंदर्याचे मिश्रण देते. पर्यटक येथे ब्रायर वुडन ब्रिज, लक्कम धबधबा आणि मट्टुपेट्टी धरण यांसारख्या जवळच्या ठिकाणांनाही भेट देऊ शकतात.
advertisement
येथील वैशिष्ठ्य : ब्रिटिशकालीन बंगल्याचा अनुभव, चहाच्या मळ्यांचे टूर आणि मुन्नारच्या नैसर्गिक चमत्कारांच्या जवळ असल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला सुट्टीसाठी हे एक योग्य ठिकाण आहे.
टी नेस्ट - कुनूर, तामिळनाडू..
नीलगिरीच्या डोंगररांगांमध्ये लपलेले, टी नेस्ट (Tea Nest) हे एक बुटीक रिट्रीट आहे, जे चहा संस्कृतीचा अनुभव देते. तुम्ही इथे चहा-थीमच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हिरव्यागार बागांमध्ये फिरू शकता आणि शांत वातावरणात आराम करू शकतात.
advertisement
येथील वैशिष्ठ्य : लॅम्ब्स रॉक, डॉल्फिन्स नोज (एक अद्वितीय रॉक फॉर्मेशन) आणि नीलगिरीमधील सर्वात उंच डोड्डाबेट्टा शिखर यांसारख्या ठिकाणांना भेट देऊन कुनूरचा अनुभव घ्या. तसेच येथील नीलगिरी चहाचे खास स्वाद आणि सुगंध ओळखायला शिका.
द आऊटर स्पेस - साथरम, केरळ..
अधिक ॲडव्हेंचरस अनुभवासाठी, द आऊटर स्पेस (The Outer Space) हे साथरम पर्वतावरील शांत ठिकाणी चहा आणि ग्लॅम्पिंगची संधी देते. गेस्ट्स येथे ग्लास टॉवर आणि ट्रान्सपरंट केबिन्समधून आजूबाजूच्या चहाच्या मळ्यांचे विहंगम दृश्य पाहू शकतात. स्टिल्ट्सवर बांधलेले किंवा पारदर्शक भिंती असलेले हे अनोखे केबिन्स पाहुण्यांना निसर्गाशी जोडतात. संध्याकाळच्या वेळी ट्रेक करा, बोनफायरचा आनंद घ्या आणि तुमच्या केबिनमध्ये आराम करा. कृपया लक्षात घ्या, या प्रॉपर्टीमध्ये फक्त शाकाहारी जेवण दिले जाते.
advertisement
येथील वैशिष्ठ्य : चहाच्या मळ्यांचे विहंगम दृश्य आणि ट्रेकिंग तसेच चांदणे पाहण्याची संधी देणारा एक खास ग्लॅम्पिंगचा अनुभव घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tea Estate Destinations : चहाच्या मळ्यांत रोमँटिक सुट्टी अनुभवायचीय? 'या' 5 टी इस्टेटला नक्की भेट द्या..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement