Navratri : दांडिया नाईट्ससाठी 5 मिनिटांत करा असा मेकअप, फॉलो करा 'हे' स्किन केअर आणि पाहा इन्स्टंट ग्लो
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
नवरात्री सुरू झाली की गरबा आणि दांडिया नाईट्सची क्रेझ वाढते. गरबा खेळताना घामामुळे मेकअप खराब होण्याची भीती असते. त्यामुळे, असा मेकअप हवा जो कमी वेळात होईल आणि बराच काळ टिकेल.
Makeup And Skin Care Routine For Navratri : नवरात्री सुरु झाली असून आता ओढ असते ती म्हणजे गरबा किंवा दांडिया नाईट्सची, पण अनेकदा बऱ्याचवेळा थकून, दमून घरी आल्यानंतर चेहरा निस्तेज दिसू लागतो. अशा वेळेस आपल्याला बाहेर जायची कितीही उत्सुकता असली तरी आपण टाळतो. पण आता या गोष्टीची काळजी करायची गरज नाही, कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहज इन्स्टंट ग्लो मिळवू शकता. नवरात्री सुरू झाली की गरबा आणि दांडिया नाईट्सची क्रेझ वाढते. गरबा खेळताना घामामुळे मेकअप खराब होण्याची भीती असते. त्यामुळे, असा मेकअप हवा जो कमी वेळात होईल आणि बराच काळ टिकेल. फक्त 5 मिनिटांत तुम्ही असा मेकअप करू शकता, जो तुम्हाला रात्री इन्स्टंट ग्लो देईल.
दांडियासाठी 5 मिनिटांचा मेकअप आणि स्किन केअर रूटीन
चेहरा स्वच्छ करा
मेकअप सुरू करण्यापूर्वी स्किन केअर खूप महत्त्वाची आहे. सर्वात आधी चेहरा चांगल्या फेस वॉशने स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील तेल आणि घाण निघून जाईल आणि मेकअपसाठी एक स्वच्छ बेस मिळेल.
मॉइश्चरायझर आणि प्राईमर
मेकअप जास्त काळ टिकावा यासाठी चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर करा. त्यानंतर, प्राईमर लावा. यामुळे त्वचेचे पोअर्स भरले जातात आणि मेकअप चेहऱ्यावर व्यवस्थित सेट होतो.
advertisement
फाउंडेशनऐवजी बी.बी. क्रीम
जाड आणि हेवी फाउंडेशन वापरण्याऐवजी लाईटवेट बी.बी. किंवा सी.सी. क्रीम वापरा. ते चेहऱ्यावरील डाग आणि असमान त्वचा टोन लपवतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतात.
डोळे आणि ओठ हायलाईट करा
जास्त वेळ नसेल, तर फक्त डोळ्यांवर काजळ किंवा आयलायनर लावा. ओठांवर तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाची डार्क शेडची लिपस्टिक लावू शकता.
advertisement
गालांवर ब्लश आणि हायलाईटर
मेकअपला पूर्ण लूक देण्यासाठी गालांवर हलका ब्लश लावा. त्यानंतर गालाच्या हाडांवर आणि नाकावर थोडासा हायलाईटर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला लगेच चमक मिळेल.
मेकअप सेट करा
सर्वात शेवटी, मेकअप जास्त वेळ टिकावा यासाठी सेटिंग स्प्रे वापरा. यामुळे तुमचा मेकअप घामामुळे खराब होणार नाही आणि तुम्ही रात्रभर दांडियाचा आनंद घेऊ शकता.
advertisement
कशी घ्यावी चेहऱ्याची काळजी
कोणतीही शारीरिक हालचाल केल्यानंतर आपल्याला घाम येतो, आणि यामुळे अनेकदा चेहऱ्यावर रॅशेस, पुरळ आणि खाज सुटते. पण काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही यापासून वाचू शकता. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरचा वापर करा. त्यानंतर थंड पाण्याने डोळे स्वच्छ करून घ्या. नाईट क्रीम किंवा लोशन लावून झोपा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 8:49 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Navratri : दांडिया नाईट्ससाठी 5 मिनिटांत करा असा मेकअप, फॉलो करा 'हे' स्किन केअर आणि पाहा इन्स्टंट ग्लो