Asia Cup : आशिया कपमध्ये पाकिस्तानचा गाशा गुंडाळण्याचा प्लान तयार, आजच कनफर्म होणार रिटर्न तिकीट

Last Updated:

आशिया कपमध्ये आज आणखी एका टीमचं आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या रात्री 8 वाजता मॅच होणार आहे.

आशिया कपमध्ये पाकिस्तानचा गाशा गुंडाळण्याचा प्लान तयार, आजच कनफर्म होणार रिटर्न तिकीट
आशिया कपमध्ये पाकिस्तानचा गाशा गुंडाळण्याचा प्लान तयार, आजच कनफर्म होणार रिटर्न तिकीट
मुंबई : आशिया कपमध्ये आज आणखी एका टीमचं आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या रात्री 8 वाजता मॅच होणार आहे, या सामन्यात पराभव झालेल्या टीमचं फायनलला पोहोचण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात येईल. याआधी सुपर-4 स्टेजमध्ये श्रीलंकेचा बांगलादेशकडून तर पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला आहे. सुपर-4 स्टेजमध्ये भारत आणि बांगलादेशच्या खात्यात प्रत्येकी 2-2 पॉईंट्स आहेत. पण नेट रनरेट चांगला असल्यामुळे भारतीय टीम आघाडीवर आहे. तर श्रीलंका तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.

...तर पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात

पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धचा हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीचा पाकिस्तानला फटका बसला. पाकिस्तानचे बॅटर तंत्र आणि अनुभवामध्ये कमी पडत आहेत. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या बॅटरनी चांगली सुरूवात केली, पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही, तसंच टीमची बॉलिंगही सतत अपयशी ठरत आहे. या सगळ्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement

श्रीलंकेला संधी

दुसरीकडे श्रीलंकेने या आशिया कपमध्ये ग्रुप स्टेजमधील सगळ्या तीन मॅच जिंकल्या, पण सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात त्यांना बांगलादेशकडून धक्का बसला. बांगलादेशविरुद्ध पाचव्या क्रमांकावर दसुन शनाकाने चांगली बॅटिंग केली. तर ग्रुप स्टेजमध्ये पथुम निसांकाने लागोपाठ दोन अर्धशतके झळकावली. कुसल मेंडिस आणि कामिल मिशारा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. बॉलिंगमध्ये फास्ट बॉलर नुवान तुषाराने प्रभावित केलं आहे. याशिवाय स्पिनर वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमीरा, चरित असलंका आणि शनाका यांनीही योगदान दिलं आहे.
advertisement

पाकिस्तानची टीम

सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर झमान, हारिस राऊफ, हसन अली, हसन नवाझ, हुसैन तलत, खुशदील शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मोकीम

श्रीलंकेची टीम

चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानिदु फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा, दासुन शनाका, जेनिथ लियानगे, चमिका करुणारत्ने, डुनिथ वेलालेगे, वानिंदू हसरंगा, महीश तीक्षणा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पथिराणा
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : आशिया कपमध्ये पाकिस्तानचा गाशा गुंडाळण्याचा प्लान तयार, आजच कनफर्म होणार रिटर्न तिकीट
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement