Chandrapur: तलावाच्या परिसरात पार्टी जिवावर बेतली, 5 तरुणांचा बुडून मृत्यू, एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश
- Published by:sachin Salve
- Reported by:Haidar Shaikh
Last Updated:
आज दुपारच्या सुमारास हे पाचही तरुण आपल्या काही मित्रांसह घोडाझरी तलावाच्या परिसरात पार्टी करण्यासाठी आले होते.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तलावाच्या परिसरात पार्टी करण्यासाठी गेलेल्या ५ तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावाच्या परिसरात आज दुपारी ही घटना घडली. जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे या पाच तरुणांचा मृतामध्ये समावेश आहे. हे सर्व युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी येथील रहिवासी होते.
आज दुपारच्या सुमारास हे पाचही तरुण आपल्या काही मित्रांसह घोडाझरी तलावाच्या परिसरात पार्टी करण्यासाठी आले होते. काही वेळानंतर या तरुणांनी आंघोळीसाठी तलावात उतरले. पण पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाचही तरुण बुडाले. या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
अधिक माहिती अशी की, ही घटना आज शनिवारी ( 15 मार्च) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाले असून शोध मोहीम सुरू झाली आहे. 5 मुले ही जिल्ह्यातीलच चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील होते. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे आणि तेजस संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राच्या समावेश आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
March 15, 2025 5:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandrapur: तलावाच्या परिसरात पार्टी जिवावर बेतली, 5 तरुणांचा बुडून मृत्यू, एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश