chhatrapati sambhaji nagar accident: भरधाव कंटेनरची छोट्या हत्तीला धडक, दोन तरुण व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

Last Updated:

chhatrapati sambhaji nagar accident: सिल्लोडचे योगेश सोनवणे आणि विवेक जेठे यांचा भीषण अपघातात मृत्यू, पवन गायकवाड गंभीर जखमी. कंटेनर चालक फरार, पोलिस तपास सुरू. परिसरात शोककळा.

News18
News18
प्रतिनिधी अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर : दोन तरुण व्यवसायिकांचा रस्ते अपघातात दुर्देवी अंत झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सिल्लोड ते भोकरदन मार्गावर रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात सिल्लोड शहरातील दोन तरुण व्यावसायिक मित्रांचा दुर्दैवी अंत झाला. भरधाव पिकअप वाहन छोटा हत्ती आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी आहे.
नेमका अपघात कसा घडला?
सिल्लोड शहरात व्यावसायिक असलेले योगेश सोनवणे आणि त्याचे मित्र रात्री सुमारे दहा ते अकराच्या दरम्यान सिल्लोडहून भोकरदनकडे पिकअप वाहनातून जात होते. पिंप्री फाट्याजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या कंटेनरची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
advertisement
दोन तरुण व्यावसायिकांचा दुर्दैवी अंत
या अपघातात योगेश सोनवणे यांच्यासह विवेक जेठे यांचा जागीच मृत्यू झाला. योगेश सोनवणे यांच्याकडे पतंजली साहित्याची एजन्सी होती, तर विवेक जेठे यांचे सिल्लोड शहरात केकचे दुकान होते. दोघेही तरुण व्यावसायिक होते. योगेश अविवाहित होता, तर विवेकच्या मागे दोन वर्षांची लहान मुलगी आहे. अपघातामुळे दोन होतकरू तरुणांचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या पवन गायकवाड या तिसऱ्या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे.
advertisement
अपघातानंतर पिंप्री फाट्याजवळच्या समाधान सिरसाठ, कृष्णा सिरसाठ आणि श्रीरंग गाडेकर या स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे आणि कर्मचारी दीपक इंगळे, पंडित फुले, दीपक पाटील यांनी जखमी व मृतांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी पवन गायकवाड याच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
advertisement
पोलिसांत गुन्हा दाखल
या अपघाताप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी दीपक इंगळे करत आहेत. सिल्लोड शहरात मेहनतीने व्यवसायात जम बसवलेल्या या दोन तरुण मित्रांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू होणे हे कुटुंबासाठी आणि सिल्लोडकरांसाठी खूप मोठे नुकसान आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
chhatrapati sambhaji nagar accident: भरधाव कंटेनरची छोट्या हत्तीला धडक, दोन तरुण व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement