शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार, रोहित पाटलांना मिळणार मोठी जबाबदारी?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षनेतृत्वात बदल केला होता. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांना दिली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार पक्षात भाकरी फिरवण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष आपापल्या परीने पक्षाची मोर्चेबांधणी करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षनेतृत्वात बदल केला होता. प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची वर्णी लावली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार पक्षात भाकरी फिरवण्याची शक्यता आहे.
आता आर आर पाटील यांचे पुत्र आणि तासगाव कवठे महांकाळचे आमदार रोहित पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षांतर्गत फेरबदल करणार असल्याची माहिती आहे. यात रोहित पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) युवक प्रदेशाध्यक्ष ही नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या युवक अध्यक्ष असलेले मेहबूब शेख यांच्याकडे बऱ्याच कालावधीपासून हे पद राहिलं आहे. त्यामुळे शरद पवार आता भाकरी फिरवण्याची शक्यता असून पक्षांतर्गत फेरबदल होताना रोहित पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हे महत्वपूर्ण बदल होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.
advertisement
खरं तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. ते अजित पवारांसोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले आहेत. अशात शरद पवार गटात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवार रोहित पाटील यांच्याकडे युवक अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 11:10 AM IST