IND vs WI Delhi Test : 23 वर्षांचा दुष्काळ संपला! 2002 नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या खेळाडूने झळकावलं शतक, पाहा कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs WI, John Campbell Century : भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी चौथ्या दिवसापर्यंत खेचण्यात जॉन कॅम्पबेलने महत्त्वाची भूमिका बजावली. अशातच चौथ्या दिवशी त्याने शतक झळकावलं आहे.
India vs West indies 2nd Test Delhi : टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जेटली खेळवला जात आहे. या मॅचमध्ये चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या बॅटर्सने टीम इंडियाचा घाम गाळला. तिसऱ्या दिवशी जॉन कॅम्पबेल आणि शे होप यांनी झुंजार खेळी केली अन् चौथ्या दिवसापर्यंत खेळ चालवला. अशातच वेस्ट इंडिजचा 23 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
23 वर्षांनंतर वेस्ट इंडिजचं शतक
वेस्ट इंडिजचा ओपनर जॉन कॅम्पबेल याने एक असा विक्रम रचला आहे, ज्याची कॅरेबियन चाहत्यांनी तब्बल 23 वर्षांपासून वाट पाहिली होती. भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिल्यानंतर, दुसऱ्या इनिंगमध्ये जॉन कॅम्पबेलने अभूतपूर्व जिद्द दाखवली आणि टेस्ट क्रिकेटमध्ये भारतात शतक झळकावणारा 23 वर्षांनंतर वेस्ट इंडिजचा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. 2002 नंतर एकाही वेस्ट इंडिज खेळाडूला भारतात कसोटीत शतक झळकावता आलं नाही.
advertisement
It took 50 Test innings for John Campbell to reach his maiden century!
A much-awaited and much-needed ton from the Windies opener to lift the spirits in their camp! #JohnCampbell #Tests #INDvWI #Sportskeeda pic.twitter.com/dW9gs0mqjo
— Sportskeeda (@Sportskeeda) October 13, 2025
advertisement
87 रन्सची झुंजार खेळी
तिसऱ्या दिवशी कॅम्पबेलने संयम आणि आक्रमकता यांचा योग्य ताळमेळ साधत 145 बॉलमध्ये 87 रन्सची झुंजार खेळी केली आणि शाई होप (66 रन्स नॉटआऊट) सोबत 138 रन्सची अभेद्य पार्टनरशिप रचून मॅचला कलाटणी दिली. मॅचच्या तिसऱ्या दिवसाखेर तो नॉटआऊट राहिल्याने टीम इंडियाच्या विजयाची वाटचाल थोडी लांबवली. अखेर जडेजाने जॉन कॅम्पबेल याची विकेट घेतली.
advertisement
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (कॅप्टन), टेविन इम्लाच (विकेटकीपर), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप आणि जेडेन सील्स.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 13, 2025 11:00 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI Delhi Test : 23 वर्षांचा दुष्काळ संपला! 2002 नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या खेळाडूने झळकावलं शतक, पाहा कोण?