Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, अभिनेते राहुल सोलापूरकरांचे वादग्रस्त वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rahul Solapur On Dr. Babasaheb Ambedkar : राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य केले.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकर यांच्या माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशाराही खरात यांनी दिला आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यात संतापाची लाट उसळली होती. एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राहून लाच देऊन निसटले होते. त्यांनी मिठाईच्या पेटाऱ्याचा वापर केला नव्हता. महाराजांनी लाच दिल्याचे पुरावे असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर राज्यात संतापाची लाट उसळली. विविध संघटनांसह राजकीय पक्षांनीदेखील तीव्र आंदोलन केले. समाजातील वाढता रोष पाहता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. हे प्रकरणाचा धुरळा खाली बसत असताना दुसरीकडे आता त्यांचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे.
advertisement
बाबासाहेब आंबेडकरांबाबत राहुल सोलापूरकर काय म्हणाले?
रामजी सकपाळ नावाच्या या एका बहुजना घरात जन्माला आलेले भीमराव जो आंबावडेकर नावाच्या गुरुजीकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव पुढं वापरतो. तो भीमराव प्रचंड अभ्यास केल्याने वेदां म्हटल्या प्रमाणे आपल्या अभ्यासाने ब्राह्मण ठरतो, असे वक्तव्य राहुल सोलापूर यांनी केले.
माफी मागा नाही तर तोंडाला काळं फासणार....
advertisement
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळे फासू, असा इशारा रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिला आहे. राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात हे विधान अत्यंत निषेधार्थ वक्तव्य केलं असल्याचे खरात यांनी म्हटले. राज्य सरकारने तात्काळ सोलापूरकर यांच्यावर कारवाई सरकारने करावी, आणि राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 09, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, अभिनेते राहुल सोलापूरकरांचे वादग्रस्त वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल