Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर हल्ला, रॉडने बेदम मारहाण

Last Updated:

Shirdi News : राहता तालुक्यातील लोणी गावात काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर हल्ला
काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर हल्ला
अहमदनगर, (हरिष दिमोटे, प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना आज घडली. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना हा हल्ला झाला. दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झाला.
काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे आज सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत असताना दहा ते बारा जणांनी अचानक गाडी समोर येत त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आली. राहता तालुक्यातील लोणी गावात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे दोघे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची इस्पितळात जाऊन भेट घेतली. यावेळी इस्पितळा बाहेर मोठी गर्दी जमली होती. आजची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय.. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी दिला.
advertisement
काही दिवसांपूर्वी सचिन चौगुले यांनी विखेंवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील वाद समोर आलाय. नेमके हल्लेखोर कोण हे शोधण्याचं पोलिसांसमोर आता आव्हान असून पोलीस काय कारवाई करतात याकडेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागंय. घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि शिर्डी ग्रामस्थांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर हल्ला, रॉडने बेदम मारहाण
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement